IPL 2020 Update: चेन्नई सुपर किंग्सच्या सर्व खेळाडूंची दुसरी COVID-19 टेस्ट रिपोर्ट आला समोर, वाचा सविस्तर
सुपर किंग्जमधील सर्व खेळाडू आणि स्टाफचा दुसरा कोविड-19 टेस्ट अहवाल नेगेटिव्ह आला आहे. त्यामुळे, एमएस धोनीच्या नेतृत्वातील सीएसके टीम शुक्रवार पासून सरावाला सुरुवात करू शकते.
आयपीएलच्या (IPL) इतिहासातील सर्वात यशस्वी संघांपैकी एक म्हणजे चेन्नई सुपर किंग्जच्या (Chennai Super Kings) चाहत्यांसाठी मोठा दिलासादायक माहिती समोर आली आहे. सुपर किंग्जमधील सर्व खेळाडू आणि स्टाफचा दुसरा कोविड-19 (COVID-19) टेस्ट अहवाल नेगेटिव्ह आला आहे. त्यामुळे, एमएस धोनीच्या (MS Dhoni) नेतृत्वातील सीएसके टीम शुक्रवार पासून सरावाला सुरुवात करू शकते आणि सीएसके आयपीएलचा सलामीचा सामना खेळण्याची शक्यताही अजून वाढली आहे. गेल्या आठवड्यात सीएसकेच्या (CSK) दोन खेळाडूंसह 13 सदस्य कोविड पॉझिटिव्ह असल्याची माहिती समोर आली होती. यानंतर, संपूर्ण टीमचा क्वारंटाइन कालावधी 4 सप्टेंबरपर्यंत वाढविण्यात आला होता. सीएसके खेळाडूंची गुरुवारी दुसरी कोरोना टेस्ट घेण्यात आली जी त्यांनी क्लिअर केली आणि आता ते सराव सत्रासाठी तयार होत आहेत. 28 ऑगस्टपासून सीएसकेचे सराव सत्र सुरु होणार होते, पण कोविड प्रकरणं आढळल्याने त्यांना ते पुढे ढकलावे लागले. (IPL 2020 Schedule Update: अखेर आज जाहीर होणार आयपीएल 13चे वेळापत्रक, मुंबई इंडियन्स-चेन्नई सुपर किंग्स यांच्यात पहिला सामना होण्याची शक्यता)
“नकारात्मक टेस्ट आल्याने आम्हाला दिलासा मिळाला आहे. प्रशिक्षक आणि कर्णधार यांच्या निर्णयानुसार आम्ही शुक्रवारी दुपारी किंवा शनिवारी सकाळी सराव सुरू करू,” सीएसकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कासी विश्वनाथन यांनी इनसाइडस्पोर्टला सांगितले. टीममध्ये 13 जणांना कोरोनाची लागण झाल्याने कोविडची दुसरी फेरी अनिवार्य करण्यात आली होती. तथापि, सीएसकेसाठी आणखी काही वाईट बातमी समोर येऊ शकते. हरभजन सिंह अद्याप युएई येथे दाखल झालेला नाही आणि तो संपूर्ण आयपीएल 2020 वगळण्याची शक्यता सध्या वर्तवली जात आहे. आयपीएल 2020 साठी काउंटडाउन सुरु झाला आहे आणि प्रत्येक उत्तीर्ण दिवसात उत्साहात वाढ होत आहे.
दुसरीकडे, बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली यांनी म्हण्टल्यानुसार आयपीएल 13चे वेळापत्रक आज जाहीर केले जाईल. एका चॅनलला दिलेल्या मुलाखतीत गांगुली म्हणाले की, “आम्हाला समजते की वेळापत्रकांमध्ये उशीर होत आहे आणि 4 सप्टेंबर रोजी म्हणजे आज वेळापत्रक घोषित करण्यात येईल.” 19 सप्टेंबर रोजी आयपीएलची सुरुवात होईल. सुरुवातीचा सामना गेतजेता मुंबई इंडियन्स आणि उपविजेते चेन्नई सुपर किंग्ज दरम्यान खेळला जाईल अशा चर्चा सध्या रंगल्या आहेत. सीएसकेमधील 13 जणं कोरोना पॉसिटीव्ह आढळल्यावर टीम सलामीचा सामना खेळू शकणार की नाही यावर चर्चा रंगली होती, त्यामुळे संपूर्ण स्थितीवर बीसीसीआय काय निर्णय घेते हे पाहणे उत्साहाचे ठरणार आहे.