IPL 2020 Update: हॉटेल रूममुळे सुरेश रैना आयपीएल 13 मधून बाहेर पडला? सीएसके बॉस एन श्रीनिवासन काय म्हणाले एकदा वाचाच

सीएसकेचे मालक आणि माजी बीसीसीआय अध्यक्ष एन श्रीनिवासन यांनी आउटलुकशी बोलताना रैनाने माघार घेणे धक्कादायक असल्याचे कबूल केले आणि त्याला “प्राइमा डोना” म्हटले. 'आउटलुक' च्या अहवालानुसार हॉटेल रूमवरून रैना आणि कर्णधार एमएस धोनीमध्ये वादही झाला.

सुरेश रैना (Photo Credits: IPLT20.com)

इंडियन प्रीमिअर लीग (Indian Premier League) सुरु होण्यापुर्वी टीमचा अष्टपैलू क्रिकेटर सुरेश रैना (Suresh Raina) अचानक बाहेर पडला. शुक्रवारी संध्याकाळी संघाचा जलदगती गोलंदाज दिपक चाहर (Deepak Chahar) आणि सपोर्ट स्टाफमधील 12 जणांना करोनाची लागण झाली. यानंतर शनिवारी ऋतुराज गायकवाडचा करोना व्हायरस (Coronavirus) अहवाल देखील पॉझिटीव्ह आल्यामुळे संघाच्या चिंतेत भर पडली. यानंतर अचानक रैनानेही "वैयक्तिक कारणास्तव" यंदाच्या हंगामातून माघार घेतल्यामुळे चेन्नई सुपर किंग्जसमोर (Chennai Super Kings) संकट निर्माण झालं. शेन वॉटसनने अनुभवी भारतीय क्रिकेटपटू भावनात्मक मेसेज दिला असला तरी संघ व्यवस्थापन आता रैनाच्या पलीकडे पाहत आहेत. शनिवारी Outlook च्या अहवालानुसार रैनाच्या जाण्यामागे हॉटेल रूम हे कारण असू शकते. 20 ऑगस्ट रोजी पंजाबच्या पठाणकोट गावात दरोडेखोरांनी आपल्या नातेवाईकाची हत्या केल्याने, तर PTI ने शुक्रवारी सांगितले की कोविड-19 च्या धोक्याने त्याला घरी परत जाण्यास उद्युक्त केले. (Chennai Super Kings च्या 13 सदस्यांना कोरोनाची लागण झाल्याने BCCI चे अध्यक्ष सौरव गांगुली यांनी दिली 'ही' प्रतिक्रिया)

सीएसकेचे मालक आणि माजी बीसीसीआय अध्यक्ष एन श्रीनिवासन (N Srinivasan) यांनी आउटलुकशी बोलताना रैनाने माघार घेणे धक्कादायक असल्याचे कबूल केले आणि त्याला “प्राइमा डोना” म्हटले. "क्रिकेटर्स हे प्राइमा डोनासारखे असतात ... जुन्या काळातील स्वभाववादी कलाकारांसारखे. चेन्नई सुपर किंग्ज हा नेहमीच कुटूंबासारखा राहिला आहे आणि सर्व ज्येष्ठ खेळाडूंनी सह अस्तित्व राहणे शिकले आहे," श्रीनिवास म्हणाले. 'आउटलुक' च्या अहवालानुसार हॉटेल रूमवरून रैना आणि कर्णधार एमएस धोनी यांच्यात वादही झाला. कॅप्टन कूलने अष्टपैलू खेळाडूला समजावण्याचा प्रयत्न केला पण त्याने नकार दिला आणि स्पर्धा सोडण्याचा निर्णय घेतला. श्रीनिवासन पुढे म्हणाले की, "माझा विचार असा आहे की आपण नाखूष असाल किंवा आनंदी नसल्यास परत जा. मी कोणालाही काहीही करण्यास भाग पाडत नाही ... कधीकधी यश तुमच्या डोक्यात जाते."

सोबतच धोनी आणि अन्य खेळाडूंमध्ये चर्चा झाल्याचेही ते म्हणाले व कोरोनाचे प्रकरण वाढले तरी काळजी करण्याची काहीच गरज नाही असे कर्णधाराने त्यांना आश्वासन दिले आहे. धोनीने झूम कॉलवर टीमशी बोलून सर्वांना सुरक्षित रहाण्यास सांगितले आहे. सीएसके 21 ऑगस्ट रोजी दुबईला पोहोचला. तेव्हापासून रैना हॉटेलच्या खोलीवर नाखूष होता आणि त्याला कोरोनासाठी कठोर प्रोटोकॉल हवा होता. त्याला धोनीसारखी खोली हवी होती कारण त्याच्या खोलीची बाल्कनी योग्य नव्हती.