IPL 2020 Update: डेविड मालन CSK टीममध्ये घेणार सुरेश रैनाची जागा? पाहा काय म्हणाले चेन्नई सुपर किंग्स CEO कासी विश्वनाथन
'यलो आर्मी' रैनाची नंबर-1 टी-20 बदली फलंदाज डेविड मालनचा विचार करत असल्याचे एका अहवालात म्हटले. तथापि, फ्रँचायझीने असे सर्व अहवाल फेटाळून लावले.
भारताचा माजी फलंदाज सुरेश रैनाने (Suresh Raina) 'वैयक्तिक कारणास्तव' यंदाच्या इंडियन प्रीमिअर लीगमधून (Indian Premier League) बाहेर पडण्याची घोषणा केली करत चेन्नई सुपर किंग्जला (Chennai Super Kings) मोठा धक्का दिला. सीएसकेचे (CSK) उप-कर्णधार घोषणा केल्यावर त्वरित दिल्लीत दाखल झाला. कोविड-19 परिस्थितीत सुधारणा झाल्यास रैनाने परतण्याचा इशारा केला, परंतु अद्याप फ्रँचायझीकडून याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. या परिस्थिती दरम्यान, 'यलो आर्मी' रैनाची नंबर-1 टी-20 बदली फलंदाज डेविड मालनचा (Dawid Malan) विचार करत असल्याचे एका अहवालात म्हटले. मालन आपल्या जीवनात सर्वात कमी फॉर्मेटमध्ये आहे आणि नुकतंच आयसीसी टी-20 क्रमवारीतही त्याने अव्वल स्थान मिळवले. तथापि, फ्रँचायझीने असे सर्व अहवाल फेटाळून लावले. ANIशी बोलताना सीएसकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कासी विश्वनाथन (Kasi Viswanathan) म्हणाले की, परदेशी कोटा भरल्यामुळे ते कोणत्याही परदेशी खेळाडूचा समावेश करू शकत नाहीत. (IPL 2020 Update: झीवाला येतेय 'पापा धोनी'ची आठवण, पत्नी साक्षीने थालाच्या 'सर्वात मोठ्या फॅन'चा शेअर केलेला व्हिडिओ पाहून तुम्हीही म्हणाल, 'किती गोड'! Watch Video)
“ही माझ्यासाठीही बातमी आहे कारण परदेशी खेळाडूंचा आमचा कोटा आधीच भरलेला आहे. म्हणून आम्हाला संघात दुसरा परदेशी कसा असू शकेल हे मला माहित नाही," सीएसकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कासी विश्वनाथन यांनी एएनआयला सांगितले. सीएसकेकडे शेन वॉटसन, लुंगी एनगीडी, इमरान ताहिर, जोश हेझलवुड, मिशेल सॅंटनर, ड्वेन ब्रावो, फाफ डू प्लेसिस आणि सॅम कुर्रान यांचा समावेश आहे.
दरम्यान, सीएसकेचा वेगवान गोलंदाज दीपक चाहरने नेगेटिव्ह टेस्ट आल्यानंतर आणि क्वारंटाइन कालावधी पूर्ण केल्यावर शुक्रवारपासून प्रशिक्षण सुरू करणार आहे. सीएसके आणि बीसीसीआयने दीपकला सर्व मंजुरी दिली असून तो शुक्रवारपासून प्रशिक्षण घेण्यास तयार आहे. दुसरीकडे, सीएसकेचा दुसरा कोरोना पॉसिटीव्ह खेळाडू, रुतुराज गायकवाड अद्यापही क्वारंटाइन आहे. आणि 24 तासांत दोनदा कोविड- नेगेटिव्ह टेस्ट आल्यावर त्याला अन्य खेळाडूंसोबत बबलमध्ये सामील होण्यास परवानगी दिली जाईल. एमएस धोनीच्या नेतृत्वात चेन्नई सुपर किंग्स 19 सप्टेंबर रोजी मुंबई इंडियन्सविरुद्ध मोहिमेची सुरुवात करेल.