IPL 2020 Update: आयपीएलमध्ये खेळाडूंसाठी इंग्लंडसारखे बायो-सुरक्षा बबल नाही? BCCI अधिकाऱ्याने दिली कोरोना व्हायरस प्रोटोकॉलवर माहिती

आयपीएल 2020 मोहिमेबाबत तथापि, समान पातळीवरील निर्बंध आवश्यक नसतील. युएईत गोष्टी नियंत्रणाखाली आल्या आहेत, त्यामुळे आयपीएलला इंग्लंडसारख्या कठोर निर्बंधांची गरज भासू शकत नाही.

मुंबई इंडियन्स-चेन्नई सुपर किंग्स (Photo Credit: Getty)

कोरोना व्हायरसमुळे तब्बल चार महिन्यांपर्यंत जगातील क्रिकेट खेळ थांबविल्यानंतर मैदानात कामकाज सुरु करणारे इंग्लंड अँड वेल्स क्रिकेट बोर्डाने (ECB) पहिले बोर्ड ठरले. खेळाडू आणि कर्मचार्‍यांना जैव-सुरक्षित बबलमध्ये (Bio-Secure Bubble) ठेवण्याचा आग्रह धरणाऱ्या विचाराधीन योजनेचा आढावा घेतल्यानंतर इंग्लंडमध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेला सुरुवात झाली. इंडियन प्रीमियर लीगच्या (Indian Premier League) 2020 मोहिमेबाबत तथापि, समान पातळीवरील निर्बंध आवश्यक नसतील. आयसीसीने टी-20 वर्ल्ड कप पुढे ढकल्याने आयपीएलचे यंदा आयोजन होणे निश्चित झाले आहे. सध्याच्या परिस्थितीनुसार ही लीग संयुक्त अरब अमिराती (UAE) येथे आयोजित केली जाईल. पहिला सामना 26 सप्टेंबर रोजी आणि अंतिम सामना 07 किंवा 08 नोव्हेंबर रोजी खेळला जाईल. (IPL 2020 Update: BCCI ने UAE मध्ये आयपीएल आयोजनासाठी दिली नवीन तारीख, वेळेतही होणार बदल, जाणून घ्या पूर्ण माहिती!)

टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, इंग्लंडच्या जैव-सुरक्षित बबल संकल्पने पहिल्या टप्प्यात यश मिळवून दिले असले तरीबीसीसीआय कदाचित युएई मधील आयपीएलसाठी सह पुढे जाऊ शकत नाही. इंग्लंड कोरोना व्हायरसमुळे सर्वाधिक प्रभावित होणाऱ्या देशांपैकी एक असून युएईमध्ये कमी-जास्त प्रमाणात व्हायरस नियंत्रणात आले आहे. “स्थानिक सरकारच्या धोरणांवर आणि कोविड-19 विरूद्ध लढा देताना देश कुठे उभा आहे यावर बायो-बबल अवलंबून आहे. युएईत गोष्टी नियंत्रणाखाली आल्या आहेत. न्यूझीलंडप्रमाणे युएईत स्टेडियममध्ये प्रेक्षकही दिसू शकतात. त्यामुळे आयपीएलला इंग्लंडसारख्या कठोर निर्बंधांची गरज भासू शकत नाही," बीसीसीआयच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.

ताज्या आकडेवारीनुसार, युएईमध्ये 57,000 पेक्षा जास्त कोविड-19 पॉझिटिव्ह प्रकरणे आहेत, तर 341 जणांचा मृत्यू झाला आहे. यापैकी सुमारे 50,000 लोक या विषाणूपासून आधीच बरे झाले आहेत असे म्हटले जात आहे. त्या तुलनेत यूकेमध्ये व्हायरसची सुमारे 3,00,000 प्रकरणे आहेत तर 45,000 पेक्षा जास्त लोकं या व्हायरसमुळे मरण पावले आहेत. म्हणूनच, युएईमध्ये यूके सारख्या मॉडेलची अंमलबजावणी करणे बीसीसीआयसाठी पूर्णपणे आवश्यक नाही.