IPL 2020 Update: लवकरच होणार आयपीएल गव्हर्निंग कौन्सिलची बैठक, BCCI करणार भारत सरकारशी चर्चा, जाणून घ्या पूर्ण प्लान

इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) गव्हर्निंग कौन्सिलचे अध्यक्ष ब्रिजेश पटेल यांनी मंगळवारी गव्हर्निंग कौन्सिलची बैठक आयपीएलच्या वेळापत्रकाची चर्चा करण्यासाठी येत्या 7 ते 10 दिवसांत होईल. यंदाचा आयसीसी टी-20 विश्वचषक अधिकृतपणे पुढे ढकलल्यामुळे इंडियन प्रीमियर लीगछे आयोजन होने जवळपास निश्चित झाले आहे.

आयपीएल ट्रॉफी (Photo Credit: IANS)

इंडियन प्रीमियर लीगच्या (IPL) गव्हर्निंग कौन्सिलचे अध्यक्ष ब्रिजेश पटेल यांनी मंगळवारी गव्हर्निंग कौन्सिलची (IPL Governing Council) बैठक आयपीएलच्या वेळापत्रकाची चर्चा करण्यासाठी येत्या 7 ते 10 दिवसांत होईल. यंदाचा आयसीसी टी-20 विश्वचषक (T20 World Cup) अधिकृतपणे पुढे ढकलल्यामुळे इंडियन प्रीमियर लीगछे आयोजन होने जवळपास निश्चित झाले आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) प्रारंभिक योजनादेखील सुरू केली असून जगातील सर्वात मोठ्या टी-20 लीगचे आयोजन करण्यासाठी आता त्यांना भारत सरकारची मान्यता शिल्लक आहे. बीसीसीआय आता येत्या काही दिवसांत सरकारची मंजूरी घेणार असून सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यापासून संयुक्त अरब अमिरातीमध्ये (United Arab Emirates) होणाऱ्या लीगची योजना निश्चित करेल. प्राथमिक योजनेनुसार लीग 26 सप्टेंबरपासून सुरू होईल आणि 7 किंवा 8 नोव्हेंबर रोजी अंतिम सामन्यासह पूर्ण हंगाम युएईमध्ये (UAE) आयोजित केला जाईल. बीसीसीआयच्या योजनांबद्दल बोलताना आयपीएल गव्हर्निंग कौन्सिलचे अध्यक्ष ब्रिजेश पटेल यांनी इंडिया टुडेला सांगितले, “आशा आहे की, पुढच्या दोन आठवड्यांत (बीसीसीआय) युएईमध्ये होणाऱ्या आयपीएलसाठी सरकारकडून परवानगी घेईल." (ICC Men's T20 World Cup 2020 Postponed: कोरोनामुळे आयसीसीने टी-20 विश्वचषक 2020 स्पर्धेचे आयोजन पुढे ढकलले)

“युएई सरकारने आम्हाला देशात आयपीएल आयोजित करण्याची ऑफर दिली आणि आम्हाला तेथील सुविधा व परिस्थितीविषयी खूप माहिती आहे. 2014 मध्ये युएईत आयपीएल (पहिला लेग) खेळला गेला होता, त्यामुळे आम्ही काय पहात आहोत हे आम्हाला ठाऊक आहे," पटेल पुढे म्हणाले. दरम्यान, आयपीएल गव्हर्निंग कौन्सिलची बैठक एका आठवड्यात होण्याची अपेक्षा आहे ज्यात वरिष्ठ व्यवस्थापन योजनेचा तपशील देतील. त्यानंतर, या योजनेसाठी सरकारची मंजुरी घेतली जाईल, ज्यानुसार भारतात वाढत्या कोविड-19 प्रकरणांच्या पार्श्वभूमीवर लीग अधिकृतपणे अरब देशात हलविण्यात येईल.

आयपीएलची सुरुवात यंदा 28 मार्च पासून होणार होती, मात्र कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर स्पर्धा अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आली. टी-20 विश्वचषकपूर्वी आशिया चषक स्पर्धा देखील पुढे ढकलण्यात आली आहे. दुसरीकडे, सप्टेंबरमध्ये आयपीएलचा 13 सीझन सुरू होण्यापूर्वी भारतीय खेळाडूंसाठी अहमदाबादच्या मोटेरा स्टेडियमवर काही आठवड्यांचे राष्ट्रीय शिबिर आयोजित होण्याची शक्यता आहे.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now