IPL 2020 Update: यंदाचे आयपीएल 13 असणार जरा हटके; 24-खेळाडूंचा संघ, क्रिकेटरला कोविड-19 झाल्यास मिळणार सब्स्टीट्यूट
कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर खेळाडूंची बदली करण्याच्या निर्णयावर रविवारी गव्हर्निंग कौन्सिलच्या बैठकीत चर्चा झाली.
19 सप्टेंबरपासून युएईमध्ये होणाऱ्या इंडियन प्रीमियर लीगमध्ये (Indian Premier League) एखाद्या खेळाडूला कोविड-19 (COVID-19) झाल्यास त्याची बदली करण्याची परवानगी फ्रॅंचायझींना देण्यात येणार आहे. कोरोना व्हायरसच्या (Coronavirus) पार्श्वभूमीवर खेळाडूंची बदली करण्याच्या निर्णयावर रविवारी गव्हर्निंग कौन्सिलच्या बैठकीत चर्चा झाली. स्पर्धेदरम्यान खेळाडूला अस्वस्थ वाटल्यास दुसऱ्या खेळाडूला त्याची जागा घेण्याची परवानगी देण्यात येईल. संयुक्त अरब अमिरातीमध्ये (United Arab Emirates) यंदा आयपीएलच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी रोडमॅपवर चर्चा करण्यासाठी प्रशासकीय समितीची रविवारी बैठक झाली. यानुसार काही महत्वपूर्ण निर्णय घटण्यास आले जेणे कसून यंदाचे आयपीएल (IPL) जरा हटके असेल हे निश्चित झाले. आयपीएलच्या फ्रँचायझींना (IPL Franchise) या स्पर्धेच्या 13 व्या आवृत्तीसाठी 24 खेळाडूंच्या पथकांना परवानगी देण्यात येणार आहे, तर पहिल्यांदा यंदाचे फायनल देखील रविवारखेरीज इतर दिवशी खेळवले जाईल. (IPL 2020 Update: आयपीएल 13 च्या तयारीसाठी टीम्स युएईला कधी रवाना होतील, BCCIने फ्रॅंचायझींना दिली महत्वपूर्ण माहिती)
रविवारी झालेल्या बैठकीनुसार आयपीएलला यंदा पूर्ण 53 दिवसांची विंडो मिळाली आहे आणि सप्टेंबर 19 पासून सुरू होऊन स्पर्धा 10 नोव्हेंबरपर्यंत खेळवली जाईल. सामन्यांच्या वेळही बदलल्या आहेत. आयपीएल 2020 मध्ये संध्याकाळचे सामने 7.30 वाजता सुरु होतील. दुपारी आयोजित होणारे 10 सामने 3:30 वाजता सुरु होतील. दरम्यान, प्रेक्षकांसाठी खुशखबर म्हणजे, सुरुवातीला स्टेडियममध्ये चाहत्यांना परवानगी नसेल परंतु स्पर्धेच्या मधल्या टप्प्यात परवानगी दिली जाईल. इंडियन प्रीमियर लीगचे (आयपीएल) आठही संघ 20 ऑगस्टनंतर युएईला रवाना होतील. स्पॉन्सरशिप डीलच्या आसपासच्या कटाक्षांवर बीसीसीआयने मंजुरी दिली आणि म्हटले की चिनी लोकांसह सर्व प्रायोजक भागीदारी करत राहतील. सद्यस्थिती लक्षात घेऊन स्पर्धेदरम्यान कोविड-19 सब्स्टीट्यूटला परवानगी दिली जाईल. प्रत्येक संघात 24 खेळाडू असतील.
आयपीएलची सुरुवात यापूर्वी 29 मार्चपासून सुरू होणार होती, परंतु 15 एप्रिलपर्यंत पुढे ढकलण्यात आली. नंतर देश आणि जगभरात वाढणाऱ्या कोरोना व्हायरस प्रकरणांमुळे टी-20 वर्ल्ड कप पुढील वर्षापर्यंत पुढे ढकलण्यात आल्याने आयपीएल आयोजनाचा मार्ग मोकळा झाला. बीसीसीआयने वेळ वाया घालवला नाही आणि लवकरच युएईमध्ये आयपीएलचे आयोजन करण्यासाठी अमिरात क्रिकेट बोर्डाकडे (ईसीबी) ‘लेटर ऑफ इंटेंट’ पाठविला. युएईमध्ये आयपीएलचे आयोजन करण्यास सरकारने संधी दिल्याने संपूर्ण आयपीएल सीझन भारताबाहेर खेळण्याची ही दुसरी वेळ आहे. 2009 मध्ये भारतात झालेल्या लोकसभा निवडणुकीमुळे आयपीएल दक्षिण आफ्रिकेत हलविण्यात आले होते.