IPL 2020 in UAE: युएई येथे सर्व भारतीय खेळाडू अपयशी! 'या' फलंदाजाच्या नावावर आहेत सर्वाधिक धावा
युएइच्या खेळपट्टीवर आजवर एकाही फलंदाजाला शतकी खेळी करता आली नाही. फक्त एका फलंदाजाने सर्वाधिक धावा नोंदवल्या आहेत आणि तो भारतीय नसून विदेशी खेळाडू आहे. येथे ऑस्ट्रेलियाचा स्टार खेळाडू ग्लेन मॅक्सवेलने चांगला रेकॉर्ड नोंदवला आहे.
इंडियन प्रीमियर लीगची (Indian Premier League) 13 वी आवृत्ती युएई येथे होणार आहे आणि 19 सप्टेंबर रोजी स्पर्धा सुरू होईल, तर 10 नोव्हेंबर रोजी अखेरचा सामना खेळला जाईल. दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियम, शेख झाएद स्टेडियम (Abu Dhabi) आणि शारजाह क्रिकेट स्टेडियम (Sharjah Cricket Stadium) ही स्पर्धेचे तीन स्थळ असतील. तथापि, युएईमध्ये आयपीएल खेळण्याची ही पहिली वेळ नाही. 2014 मध्ये युएईमध्ये (UAE) तब्बल 20 आयपीएल सामने खेळले गेले होते, तर अबू धाबी आणि दुबई हे सात सामने खेळले होते, आणि शारजाह येथे सहा सामने खेळले गेले होते. मात्र, 2014 मध्ये झालेल्या आयपीएल (IPL) सामन्यांमध्ये फलंदाजांना विशेष चांगली कामगिरी करता आली नाही. युएइच्या खेळपट्टीवर आजवर एकाही फलंदाजाला शतकी खेळी करता आली नाही. विराट कोहली, रोहित शर्मा, डेविड वॉर्नर, क्रिस गेल, एबी डिव्हिलियर्ससारखे फलंदाजही या पीचवर धावा करण्यात अपयशी झाले आहेत. (मुंबई इंडियन्स, चेन्नई सुपर किंग्स, कोलकाता नाईट रायडर्स व इतर, फॉलोअर्सवर आधारित इंडियन प्रीमियर लीग फ्रँचायझींची रँकिंग)
मात्र, फक्त एका फलंदाजाने सर्वाधिक धावा नोंदवल्या आहेत आणि तो भारतीय नसून विदेशी खेळाडू आहे. येथे ऑस्ट्रेलियाचा स्टार खेळाडू ग्लेन मॅक्सवेलने चांगला रेकॉर्ड नोंदवला आहे. 2014 दरम्यान किंग्ज इलेव्हन पंजाबकडून खेळताना मॅक्सवेलने तुफान फलंदाज केली होती. त्यावेळी मॅक्सवेलने पंजाबसाठी सर्वोत्तम कामगिरी केली होती. त्याने युएईमधील सामन्यांमध्ये तीन प्लेअर ऑफ द मॅच ट्रॉफी जिंकल्या. त्या सत्रात मॅक्सवेलची तीन अर्धशतकं इतर कोणत्याही खेळाडूपेक्षा अधिक होती. मॅक्सवेलच्या खेळीच्या जोरावर त्या वेळी युएईमध्ये किंग्ज इलेव्हन पंजाबने त्यांचे पाचही सामने जिंकले. त्यांनी युएईमध्ये कधीही आयपीएल खेळ गमावला नाही आणि टी-20 लीगच्या आगामी आवृत्तीत शक्य होई पर्यंत त्यांचा हा विक्रम वाढविण्यासाठी उत्सुक असेल.
मॅक्सवेलने चेन्नई सुपर किंग्जविरुद्ध झालेल्या सामन्यात 43 चेंडूत 95 धावांची खेळी केली होती ज्यात 15 चौकार आणि 2 षटकारांचा समावेश होता. यंदाही मॅक्सवेल किंग्ज इलेव्हन पंजाबकडून खेळताना दिसेल. या वर्षासाठी झालेल्या लिलावात पंजाब फ्रँचायझीने मॅक्सवेलला तब्बल 10.75 कोटी रुपयांत खरेदी केले.