IPL 2020 Teams Squad Update: बंगालचे वेगवान गोलंदाज आकाशदीप, सयान घोष यांची राजस्थान रॉयल्स व किंग्ज इलेव्हन पंजाबचे नेट गोलंदाज म्हणून निवड
आकाशदीप आणि सायन घोष, या बंगाल वेगवान जोडीची युएईमध्ये 19 सप्टेंबर ते 10 नोव्हेंबर या कालावधीत अनुक्रमे राजस्थान रॉयल्स आणि किंग्ज इलेव्हन पंजाब संघात नेट गोलंदाज म्हणून निवड करण्यात आली आहे. आकाश दीप आणि घोष फ्रँचायझीमध्ये सामील होण्याच्या संभाव्यतेबद्दल उत्सुक आहेत आणि ऑगस्टच्या तिसर्या आठवड्यात ते युएईसाठी रवाना होतील.
आकाशदीप (Akashdeep) आणि सायन घोष (Sayan Ghosh) बांगलाच्या वेगवान जोडीची युएईमध्ये 19 सप्टेंबर ते 10 नोव्हेंबर या कालावधीत अनुक्रमे राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals) आणि किंग्ज इलेव्हन पंजाब (Kings XI Punaj) संघात नेट गोलंदाज म्हणून निवड करण्यात आली आहे. “आम्हाला आनंद आहे की फ्रँचायझींनी दोन तरुण मुलांमध्ये रस दाखविला आहे. गेल्या काही दिवसांपासून यासंबंधी चर्चा सुरू होती आणि आज त्यांनी त्यास दुजोरा दिला आहे. ते संघातील गोलंदाज म्हणून सामील होतील, या दोघांनाही त्यांच्या यशासाठी शुभेच्छा,” कॅबचे अध्यक्ष अविशेक डालमिया यांनी एका निवेदनात म्हटले. सीएबीचे सचिव स्नेहासिश गांगुली (Snehasish Ganguly) म्हणाले, “हे खेळाडू खूपच हुशार आहेत आणि त्यांच्यात बरीच क्षमता आहे. फ्रॅन्चायझींमध्ये सुमारे 75 ते 80 दिवसांचा हा प्रवास त्यांच्या कौशल्यांमध्ये आणखी वाढ करण्यात मदत करेल.” आकाश दीप आणि घोष फ्रँचायझीमध्ये सामील होण्याच्या संभाव्यतेबद्दल उत्सुक आहेत आणि ऑगस्टच्या तिसर्या आठवड्यात ते युएईसाठी रवाना होतील. (IPL 2020 Update: CSK, KKR संघ UAE ला नेणार 10 उदयोन्मुख नेट गोलंदाजांचा विशेष ताफा, दिल्ली कॅपिटल्स संघानेही केली 6 नेट गोलंदाजांची नियुक्ती)
गेल्या हंगामात घोषला दिल्लीच्या कॅपिटलने 20 लाख रुपयांत निवडले होते पण, त्याला खेळण्याची संधी मिळाली नाही. केएल राहुल आणि क्रिस गेल सार्ख्यांसमोर गोलंदाजी करण्यासाठी उत्सुक असल्याचे घोषने म्हटले. PTIला घोषने सांगितले की,“ही माझ्यासाठी एक उत्तम संधी आहे.आणि मला जो अनुभव मिळेल तो भविष्यात बंगालला मदत करेल. घरात लॉकडाउन होण्यापासून हे स्वागतार्ह ब्रेक आहे. मी गोलंदाजी करून क्रिकेट खेळू शकतो, ही एक चांगली प्रेरणा आहे.”
या सर्व ज्युनिअर फ्रिंज खेळाडूंव्यतिरिक्त नेट गोलंदाजांसाठी स्थानिक खेळाडूंचे पाचारण केले जायचे, पण अमिरातीमधील जैव-सुरक्षा नियमावलीमुळे संघांवरील बंधने वाढली आहेत. त्यामुळे प्रत्येक संघांना सराव सत्रांसाठी गोलंदाजांची व्यवस्था स्वत:च करावी लागणार आहे. दरम्यान, युएई येथे आयपीएलपूर्वी बीसीसीआय सध्या मुख्य स्पॉन्सर शोधायच्या प्रक्रियेत आहे. भारत-चीन सीमा तणावामुळे 'विवो'ने यंदासाठी मुख्य प्रायोजक म्हणून माघार घेतली. त्यानंतर बीसीसीआयने यासाठी टेंडर जाहीर केले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार बायजूज, कोका कोला इंडिया, पेटीएम, पतंजली आयुर्वेद आणि ऍमेझॉन प्रायोजक बनण्याच्या शर्यतीत उतरले आहेत.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)