MS Dhoni-Led CSK Leaves For UAE: एमएस धोनी, सुरेश रैनासह चेन्नई सुपर किंग्ज UAE साठी रवाना, RCBने देखील भरले उड्डाण (See Pics)

महेंद्र सिंह धोनीसह चेन्नई सुपर किंग्जचे खेळाडू इंडियन प्रीमियर लीगसाठी (आयपीएल) चेन्नई विमानतळावरून संयुक्त अरब अमिरातीला (युएई) रवाना झाले आहेत. धोनीच्या नेतृत्वाखालील सीएसके टीम चेन्नई विमानतळावरून युएईला चार्टर विमानाने उड्डाण केले. सीएसके टीम यलो टी-शर्ट आणि ट्राउझर्समध्ये दिसली.

महेंद्र सिंह धोनीसह चेन्नई सुपर किंग्ज UAE साठी रवाना (Photo Credit: ANI)

महेंद्र सिंह धोनीसह (Mahendra Singh Dhoni) चेन्नई सुपर किंग्जचे (Chennai Super Kings) खेळाडू इंडियन प्रीमियर लीगसाठी (Indian Premier League) चेन्नई विमानतळावरून संयुक्त अरब अमिरातीला (युएई) रवाना झाले आहेत. आयपीएल स्पर्धा युएईमध्ये (UAE) 19 सप्टेंबर 2020 ते 10 नोव्हेंबर 2020 या कालावधीत खेळली जाईल. आयपीएल यंदा 53 दिवसीय स्पर्धा होणार असून यामध्ये दुपारी 3:30 वाजता खेळले जातील तर संध्याकाळचे सामने 7:30 वाजता सुरू होतील. आयपीएलमध्ये यावेळी 10 डबल-हेडर खेळले जातील. आयपीएलचा पहिला सामना 4 वेळा विजेता मुंबई इंडियन्स आणि 3 वेळा विजेते चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात सप्टेंबर 19 रोजी होईल. धोनीच्या नेतृत्वाखालील सीएसके (CSK) टीम चेन्नई विमानतळावरून युएईला चार्टर विमानाने उड्डाण केले. सीएसके टीम यलो टी-शर्ट आणि ट्राउझर्समध्ये दिसली. संघातील क्रिकेटपटूंनी पीपीई किट घातलेले नव्हते, जरी सर्व क्रिकेटर्सच्या चेहर्‍यांवर मास्क घातले होते. (IPL 2020 Update: CSK स्टार शेन वॉटसनने युएईमध्ये आल्यानंतर क्वारंटाईन जीवनाची दिली झलक, दुबईच्या हॉटेल रूममधून दाखवला बुर्ज खलिफाचा नजारा Watch Video)

धोनीची एक झलक पाहण्यासाठी अनेक चाहते आणि एअरपोर्ट स्टाफ चेन्नई विमानतळाबाहेर पाहायला मिळाले. धोनीने 15 ऑगस्ट रोजी संध्याकाळी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. धोनी व्यतिरिक्त सीएसके आणि टीम इंडियाचा सहकारी सुरेश रैनानेही आंतरराष्ट्रीय क्रिकेटला निरोप दिला. सुमारे आठवडाभर या प्रशिक्षण शिबिरात खेळाडू उपस्थित होते. सीएसके टीममधील ज्येष्ठ फिरकी गोलंदाज हरभजन सिंह गायब होता. भज्जी काही वैयक्तिक कारणामुळे सीएसके टीमबरोबर प्रवास करणार नाही आणि एक आठवड्यानंतर युएईसाठी उड्डाण करेल.

दरम्यान, चेन्नईसोबत रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरने (आरसीबी) देखील युएईसाठी उड्डाण भरले. आरसीबीने त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवर टीमचे फोटो शेअर केले ज्यात ते प्लेनमध्ये पूर्ण सुरक्षिततेसह बसलेले दिसत आहेत.

दुसरीकडे, ऑस्ट्रेलियाचा माजी फलंदाज शेन वॉटसन युएईमध्ये दाखल झाला आहे. उर्वरित संघाप्रमाणेच सीएसके आता युएईमध्ये सहा दिवस क्वारंटाइन राहणार असून त्यानंतर संघ बायो-सुरक्षित बबलमध्ये प्रवेश करेल. मिळालेल्या माहिती नुसार, बुज खलिफाला लागूनच ताज दुबई येथे चेन्नई सुपर किंग्ज राहणार आहे. हे एक लक्झरी हॉटेल आहे. सीएसकेने आपल्या टीमसाठी हॉटेलमध्ये एक पूर्ण मजला बुक केला आहे.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now