IPL 2020 Stat Update: आयपीएलच्या 'डेथ ओव्हर'मध्ये 'या' रन रेटने धावा करून फलंदाज घालतायत धुमाकुळ, आकडे जाणून तुम्हीही व्हाल चकित!
आणि सध्या युएईमध्ये सुरु असलेल्या इंडियन प्रीमियर लीगचा 13वा सत्र याला अपवाद नाही आणि खेळल्या गेलेल्या लीगच्या आठव्या सामन्यापर्यंत संघाने डावाच्या 20 व्या ओव्हरमध्ये 14.54 च्या सरासरीने धावा केल्या आहेत.
IPL 2020: टी-20 क्रिकेटमधील डावातील 20वी ओव्हर फलंदाजांना अखेरच्या सहा चेंडूंवर शक्य तितके धावा करण्याचा प्रयत्न करत असताना धावा करण्याची उत्तम संधी देते. आणि सध्या युएईमध्ये (UAE) सुरु असलेल्या इंडियन प्रीमियर लीगचा (Indian Premier League) 13 वा सत्र याला अपवाद नाही आणि शनिवारी कोलकाता नाईट रायडर्स व सनरायझर्स हैदराबाद यांच्यात खेळल्या गेलेल्या लीगच्या आठव्या सामन्यापर्यंत संघाने डावाच्या 20 व्या ओव्हरमध्ये 14.54 च्या सरासरीने धावा केल्या आहेत. अनुभवी क्रिकेट सांख्यिकीय मोहनदास मेनन यांच्या म्हणण्यानुसार, आयपीएलच्या (IPL) 13 व्या सत्रात खेळलेल्या आठ सामन्यात 78 चेंडूत (20व्या ओव्हरमध्ये) 189 धावा केल्या आहेत. 20 व्या ओव्हरतिरिक्त 18व्या ओव्हरमध्ये 11.80च्या सरासरीने आहे, तर 17व्या ओव्हरमध्ये 10.44 च्या सरासरीने धावा केल्या. हे चकित करणारे आकडे शनिवारपर्यंत खेळल्या गेलेल्या सामन्यांचे आहेत. (IPL 2020 Top-Scores So Far: KXIP कर्णधार केएल राहुल, MIचा रोहित शर्मा ते संजू सॅमसन; UAEमध्ये आजवर भारतीय फलंदाजांचे वर्चस्व, पाहा आकडेवारी)
मेनन यांनी आयएएनएसला सांगितले की, 19व्या ओव्हरमध्ये फलंदाजी करणाऱ्या टीमने आजवर फारशा धावा केल्या नाहीत जे मनोरंजक आहे. ते म्हणाले, "डावातील 19 वी ओव्हर संघातील सर्वोत्तम गोलंदाज फेकतो आणि या ओव्हरमध्ये आतापर्यंत 9.14 च्या सरासरीने धावा केल्या आहेत." दुसरीकडे, डावात सर्वात कमी धावा दुसर्या, पहिल्या आणि 11व्या ओव्हरमध्ये केल्या गेल्या आहेत. दुसर्या ओव्हरमध्ये मैदानावर निर्बंध लागू होताच या ओव्हरमध्ये 5.25च्या सरासरीने धावा केल्या गेल्या आहेत. शनिवारपर्यंत खेळल्या गेलेल्या इतर आठ सामन्यात जितके दुसरे ओव्हर टाकले गेले त्यात आजवर फक्त 84 धावा केल्या गेल्या आहेत.
पहिल्या ओव्हरमध्ये आजवर 5.31 च्या सरासरीने आणि 11व्या ओव्हरमध्ये 6.31 धावा केल्या आहेत. दरम्यान, मेनन पुढे म्हणाले की गोलंदाजीच्या बाबतीत आजवर 16व्या आणि 20व्या ओव्हरमध्ये सर्वाधिक विकेट पडल्या आहेत. या दोन्ही ओव्हरमध्ये एकूण 11 विकेट पडल्या आहेत. तथापि, जसजशी स्पर्धा पुढे जाईल तसतसे ही आकडेवारी बदलत जाईल.