IPL Auction 2025 Live

IPL 2020: ‘प्रिय व्यक्तीच्या निधनाने दु:ख होतं पण...,’ मनदीप सिंह, नितिश राणा यांना मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा सलाम

नितीशच्या सासर्यांचे त्याच काळात निधन झाले असताना मनदीपच्या वडिलांचे शुक्रवारी निधन झाले. परंतु वैयक्तिक नुकसानानंतरही रविवारी नितीश आणि मनदीप आपल्या संघासाठी मैदानावर उतरले.

मनदीप सिंह आणि नितीश राणा यांना सचिन तेंडुलकरचा सलाम (Photo Credit: Twitter/IPL)

IPL 2020: किंग्ज इलेव्हन पंजाबचा मनदीप सिंह (Mandeep Singh) आणि कोलकाता नाईट रायडर्सचा फलंदाज नितीश राणा (Nitish Rana) यांच्यासाठी हा भावनिक शनिवार होता. नितीशच्या सासर्यांचे त्याच काळात निधन झाले असताना मनदीपच्या वडिलांचे शुक्रवारी निधन झाले. परंतु वैयक्तिक नुकसानानंतरही रविवारी नितीश आणि मनदीप आपल्या संघासाठी मैदानावर उतरले. शेख झायेद स्टेडियमवर केकेआरने 195 धावसंख्येत राणाने अर्धशतक ठोकले आणि आपला डाव आपल्या सासऱ्यांना अर्पित करून श्रद्धांजली वाहिली. क्रिकेटच्या दिग्गज सचिन तेंडुलकरने (Sachin Tendulkar) कौटुंबिक शोकांतिका सहन करूनही राणा आणि मनदीपचे खेळण्याकडे दुर्लक्ष न केल्याबद्दल त्यांचे कौतुक केले. सचिनने ट्वीट करत म्हटले, "आपल्या जवळच्या व्यक्तींच्या निधनाने दु:ख होतंच, पण त्याहून वाईट म्हणजे आपल्याला त्यांना अखेरचा निरोपही देता येत नाही. मनदीप आणि नितिश दोघांच्या कुटुंबासाठी मी प्रार्थना करतो आणि आज तुम्ही संघासाठी जे केलं, त्यासाठी तुम्हाला सलाम." (KKR vs DC, IPL 2020: नितिश राणाने दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध अर्धशतकानंतर दाखवली 'सुरींदर' नावाची जर्सी, जाणून घ्या कारण)

कर्करोगामुळे सासऱ्यांचे निधन झाल्यावरही राणा दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध केकेआरसाठी खेळण्यासाठी मैदानावर उतरला आणि अर्धशतकी खेळी केली. राणाने 53 चेंडूत 13 चौकार आणि एका षटकारासह 81 धावांची खेळी साकारली तर सुनील नारायणने 61 धावा केल्या आणि केकेआरला 6 विकेट गमावून 194 धावांपर्यंत मजल मारून दिली. अखेरीस केकेआरने दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध 59 धावांनी जोरदार विजय मिळवला.दुसरीकडे, सनरायझर्स हैदराबादविरुद्ध मनदीपने केएक्सआयपीकडून 17 धावा केल्या. मनदीपच्या वडिलांच्या सन्मानात संपूर्ण केएक्सआयपी टीम हातावर काळ्या पट्ट्या लावल्या होत्या.

पाहा सचिनने ट्विट

लक्षात घेण्यासारखे म्हणजे, 1999 विश्वचषक स्पर्धेदरम्यान सचिनच्याही वडिलांचे निधन झाले होते. पण विधी पूर्ण झाल्यानंतर सचिन या स्पर्धेत भाग घेण्यासाठी परत लंडनला गेला. केनियाविरुद्ध महत्त्वपूर्ण चकमकीत शतक झळकावत त्याने परतण्याची घोषणा केली. या सामन्यात त्याने 140 धावांची शतकी खेळी करत वडिलांना श्रद्धांजली वाहिली होती.