IPL 2020: आधी एमएस धोनीला केलं क्लीन बोल्ड, मग CSK कर्णधाराकडूनच KKRच्या वरुण चक्रवर्तीला मिळाल्या टिप्स, पाहा Video

केकेआरचा स्टार गोलंदाज वरुण चक्रवर्तीने महेंद्र सिंह धोनीला यंदाच्या मोसमात सलग दुसऱ्यांदा क्लीन बोल्ड केले. असे असूनही, खेळ संपल्यानंतर धोनी त्याला काही टिप्स देताना दिसला. नाईट रायडर्सनी धोनी आणि चक्रवर्तीचा एक गप्पा मारताना व्हिडिओ ट्विटरवर पोस्ट केला आहे.

एमएस धोनी-वरुण चक्रवर्ती यांच्यातील संभाषण (Photo Credits: Instagram)

IPL 2020: चेन्नई सुपर किंग्स (Chennai Super Kings) आणि कोलकाता नाईट रायडर्स (Kolkata Knight Riders) यांच्यात गुरुवारी आयपीएल 2020 चा 49वा सामना खेळला गेला. या सामन्यात सीएसकेने (CSK) केकेआरचा (KKR) 6 गडी राखून पराभव केला. केकेआरचा स्टार गोलंदाज वरुण चक्रवर्तीने (Varun Chakravarthy) दिग्गज फलंदाज आणि जगातील सर्वोत्कृष्ट फिनिशर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महेंद्र सिंह धोनीला (Mahendra Singh Dhoni) यंदाच्या मोसमात सलग दुसऱ्यांदा क्लीन बोल्ड केले. यापूर्वीच्या सामन्यात देखील वरुणने धोनीला बोल्ड केले. यासह, धोनीला क्लीन बोल्ड करणारा तो पहिला फिरकीपटू बनला आहे. असे असूनही, खेळ संपल्यानंतर धोनी त्याला काही टिप्स देताना दिसला. दरम्यान, नाही तर सध्या सुरू असलेल्या इंडियन प्रीमियर लीगमध्ये (Indian Premier League) तो चांगली कामगिरी करत आहे आणि अलीकडेच त्याला ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी पहिल्यांदा भारतीय संघात सामील केले गेले. त्याने 12 सामन्यांत आतापर्यंत 15 विकेट घेतल्या आहे, ज्यात धोनीच्या दोन विकेटचाही समावेश आहे. केकेआर आणि सीएसकेमधील आयपीएल सामन्यानंतर कोलकाता नाईट रायडर्सनी धोनी आणि चक्रवर्तीचा एक गप्पा मारताना व्हिडिओ ट्विटरवर पोस्ट केला आहे. (CSK vs KKR, IPL 2020: रुतुराज गायकवाडचा केकेआरला दे धक्का! CSKने 6 विकेटने नाईट रायडर्सविरुद्ध मिळवला नाट्यमय विजय)

“चेपाक येथील स्टँडवरुन त्याचे कौतुक करण्यापासून आतापर्यंत ...वरुण चक्रवर्तीची परीकथा चालूच आहे!” असे कॅप्शन देत केकेआरने ट्विटरवर धोनी आणि वरुणचा सामन्यानंतर गप्पा मटणाचा व्हिडिओ शेअर केला. चक्रवर्तीने सीएसकेविरुद्ध अपवादात्मक गोलंदाजी केली आणि चार ओव्हर20 धावा देत दोन गडी बाद केले. आपल्या अंतिम ओव्हरमध्ये धोनीला बोल्ड करण्यापूर्वी वरुणने शेन वॉट्सनला देखील माघारी धाडलं. पाहा धोनी आणि वरुणचा हा खास व्हिडिओ:

दुसरीकडे, ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी भारतीय संघात निवड झाल्यावर वरुण चक्रवर्तीने बीसीसीआय टीव्हीशी बोलताना आनंद व्यक्त केला. त्याने BCCI.tvला सांगितले की “सामना संपल्यानंतर मला कळले (माझी भारतीय संघात निवड झाल्याबद्दल). मी तोच शब्द पुन्हा पुन्हा वापरत राहतो, हे काल्पनिक आहे.” माझे मूलभूत नियमितपणे संघात खेळणे आणि कामगिरी करुन त्यांच्या विजयात योगदान देणे आहे. मी भारतासाठीही असेच करण्यास सक्षम होईन अशी आशा आहे. मी सोशल मीडियावर फारसे अ‍ॅक्टिव्ह नाही आणि निवडकर्त्यांचा माझ्यावर विश्वास ठेवल्याबद्दल त्यांचे आभार मानतो. माझ्याकडे शब्द नाहीत.”