IPL 2020 Most Expensive Captain: आयपीएल 13 मध्ये 8 संघांची धुरा सांभाळणार 'हे' खेळाडू, जाणून घ्या कोणाला मिळतात सर्वाधिक पैसे
इंडियन प्रीमियर लीगचे (आयपीएल) 13 वे सत्र शनिवार, 19 सप्टेंबरपासून संयुक्त अरब अमिरातीमध्ये (युएई) रंगणार आहे ज्यात एकूण 8 संघ सहभागी होणार आहेत. आज आपण सर्व आयपीएल फ्रेंचायझीचे कर्णधार आणि त्यांच्या पगाराबद्दल सांगणार आहोत. आयपीएलच्या 13 व्या हंगामात कोणत्या कर्णधाराला किती रक्कम खेळायला मिळणार ते आपण आज या लेखात पाहणार आहोत.
इंडियन प्रीमियर लीगचे (Indian Premier League) 13 वे सत्र शनिवार, 19 सप्टेंबरपासून संयुक्त अरब अमिरातीमध्ये (United Arab Emirated) रंगणार आहे. आयपीएल (IPL) 2020 युएई (UAE) दरम्यान दुबई, शारजाह आणि अबू धाबी येथे सामने खेळवले जातील ज्यात एकूण 8 संघ सहभागी होणार आहेत. आज आपण सर्व आयपीएल फ्रेंचायझीचे कर्णधार (IPL Franchise Captains) आणि त्यांच्या पगाराबद्दल सांगणार आहोत. आयपीएलच्या 13 व्या हंगामात कोणत्या कर्णधाराला किती रक्कम खेळायला मिळणार ते आपण आज या लेखात पाहणार आहोत. तथापि, ही रक्कम फक्त त्यांच्या रिटेन रकमेची असते जी, कर्णधार आणि सर्व खेळाडूंना आयपीएलच्या शेवटपर्यंत तीन ते चार हप्त्यांमध्ये मिळते. याशिवाय त्यांना मॅच फी आणि इतर भत्तेही मिळतात, परंतु या क्षणी आम्ही तुम्हाला त्यांच्या पगाराबद्दल सांगणार आहोत. आयपीएल 2020 मध्ये ज्या कर्णधाराचा पगार सर्वात कमी आहे ती रक्कम 7 कोटी आहे, तर ज्या कर्णधाराला सर्वाधिक पगार मिळतो तो 17 कोटी रुपये आहे. (IPL's Most Successful Captains: महेंद्र सिंह धोनी, विराट कोहली की रोहित शर्मा? आयपीएल इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधार)
श्रेयस अय्यर-7 कोटी
2018 मध्ये जेव्हा गौतम गंभीरने दिल्ली कॅपिटलच्या कर्णधारपदाचा राजीनामा दिला तेव्हा युवा खेळाडू श्रेयस अय्यरला जबाबदारी देण्यात आली होती. त्यानंतर त्याने आयपीएल 2019 चे नेतृत्व केले आणि टीमने प्ले-ऑफमध्ये स्थान मिळवले. त्यामुळे पुन्हा एकदा दिल्लीने श्रेयसला जबाबदारी दिली आहे. खेळाडू आणि कर्णधार म्हणून त्याला यंदा आयपीएलसाठी 7 कोटी रुपये मिळणार आहेत.
दिनेश कार्तिक-7.40 कोटी
दोन वेळा आयपीएल विजेता कोलकाता नाईट रायडर्सचे (केकेआर) संघाचा कर्णधार असलेल्या कार्तिकच्या नेतृत्वात 2018 मोसमात प्ले-ऑफ गाठले, परंतु मागील वर्षी टीमने निराश केले. असे असूनही केकेआरने त्याला कर्णधारपदावर कायम ठेवले आणि यंदा आयपीएलसाठी 7.4 कोटी रुपये मिळणार आहेत.
केएल राहुल-11 कोटी
केएल राहुल पहिल्यांदा आयपीएल संघाचे नेतृत्व करणार आहेत. आर अश्विनने संघ सोडल्यानंतर किंग्ज इलेव्हन पंजाबने राहूलला कर्णधार म्हणून नियुक्त केले. पंजाबने त्याला 11 कोटी रुपयांत खेळाडू आणि कर्णधार म्हणून कायम ठेवले आहे. अशा स्थितीत संघाकडून त्यांच्याकडून मोठ्या अपेक्षा बाळगल्या जातील.
डेविड वॉर्नर-12.50कोटी
सनरायझर्स हैदराबादचा यशस्वी कर्णधार डेव्हिड वॉर्नर पुन्हा एकदा संघाचे नेतृत्व करीत आहे. वॉर्नरच्या नेतृत्वात हैदराबादने यापूर्वी आयपीएल विजेतेपद जिंकले होते. खेळाडू आणि कर्णधार म्हणून वॉर्नरला आयपीएलच्या 13 व्या सत्रात हैदराबाद फ्रँचायझीकडून 12.5 कोटी रुपये मिळतील.
स्टिव्ह स्मिथ-12.5 कोटी
ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार स्टीव्ह स्मिथला गेल्या वर्षी राजस्थान रॉयल्स फ्रँचायझीने संघाचा कर्णधार म्हणून नियुक्त केले होते. मध्य आयपीएलमध्ये अजिंक्य रहाणेला कर्णधारपदावरून काढून स्मिथला जबाबदारी देण्यात आली. यंदाच्या मोसमासाठी राजस्थानने स्मिथला 12.5 कोटी रुपयात रिटेन केले.
रोहित शर्मा-15 कोटी
भारतीय कर्णधाराला मिळणारीही दुसरी सर्वात मोठी रक्कम आहे. रोहितला मुंबई इंडियन्सकडून 15 कोटींची भरमसाट रक्कम मिळणार आहे आणि तो या रकमेच्या योग्य देखील आहे, कारण रोहितच्या नेतृत्वात मुंबई इंडियन्सने चार वेळा आयपीएलचे जेतेपद जिंकले.
एमएस धोनी-15 कोटी
चेन्नई सुपर किंग्जने माजी भारतीय खेळाडू आणि कर्णधार महेंद्र सिंह धोनीला आयपीएल 2020 साठी 15 कोटींमध्ये कायम ठेवले. 38 वर्षीय धोनी अजूनही सर्वात महागड्या खेळाडूंमध्ये सामील आहे. आयपीएलमध्ये तीन वेळा सीएसकेला चॅम्पियन बनवण्याबरोबरच धोनीच्या नेतृत्वात सीएसकेने प्रत्येक वेळी प्ले-ऑफ गाठले आहे.
विराट कोहली-17 कोटी
आयपीएल 2020 मधील सर्वात महागडा कर्णधार विराट कोहली आहे. विराटला या हंगामासाठी रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूकडून (आरसीबी) 17 कोटी रुपये मिळणार आहेत. कोहलीने आरसीबीसाठी फलंदाज म्हणून बरीच सामने जिंकले आहेत, परंतु अद्याप तो संघाला चॅम्पियन बनवू शकलेला नाही. अशा परिस्थितीत ही रक्कम त्याला फलंदाज म्हणून शोभते, परंतु कर्णधार म्हणून त्याला फारसे यश मिळाले नाही.
आयपीएलमध्ये विराट कोहली, रोहित शर्मा, एमएस धोनी, श्रेयस अय्यर, केएल राहुल, दिनेश कार्तिक असेभारताचे 6, तर स्टिव्ह स्मिथ आणि डेविड वॉर्नर हे दोन परदेशीकर्णधार असतील.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)