IPL 2020: KKRला धक्का, एकही सामना न खेळता USAच्या अली खानने घेतली माघार, जाणून घ्या कारण
वेगवान गोलंदाज कोलकाता नाईट रायडर्सच्या संघात होता आणि दुखापतग्रस्त हॅरी गुर्नीच्या जागी संघात सामील झाला होता. केकेआर टीमसाठी ही एक धक्कादायक बाब मानली जात आहे. आयपीएलमध्ये भाग घेणारा अली खान हा पहिला अमेरिकन क्रिकेटपटू होता
अमेरिकेचा वेगवान गोलंदाज अली खान (Ali Khan) दुखापतीमुळे चालू असलेल्या इंडियन प्रीमियर लीगमधून (Indian Premier League) बाहेर पडला आहे. वेगवान गोलंदाज कोलकाता नाईट रायडर्सच्या (Kolkata Knight Riders) संघात होता आणि दुखापतग्रस्त हॅरी गुर्नीच्या जागी संघात सामील झाला होता. केकेआर (KKR) टीमसाठी ही एक धक्कादायक बाब मानली जात आहे. आयपीएलमध्ये (IPL) भाग घेणारा अली खान हा पहिला अमेरिकन क्रिकेटपटू (USA) होता, पण त्याला आता स्पर्धेतून माघार घ्यावी लागली आहे. यामुळे आता तो यंदा आयपीएलमध्ये पदार्पण करू शकणार नाही. केकेआरने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, "अली खान हा आयपीएलमध्ये खेळणारा पहिला अमेरिकन क्रिकेटपटू होता, परंतु दुखापतीमुळे त्याला या स्पर्धेतून बाहेर पडावे लागले. सराव करताना अलीला दुखापत झाली होती." कॅरिबियन प्रीमियर लीगमध्ये (Carribean Premier League) उत्कृष्ट कामगिरीच्या जोरावर अली आयपीएलमध्ये सामील झाला होता. सीपीएलमध्ये त्याने 8 सामन्यात 8 विकेट घेतल्या आणि शानदार प्रदर्शन केले. (How To Download Hotstar & Watch KKR Vs CSK Live Match: कोलकाता नाईट रायडर्स आणि चेन्नई सुपर किंग्स यांच्यातील आयपीएल लाईव्ह सामना पाहण्यासाठी हॉटस्टार डाउनलोड कसे करावे? इथे पाहा)
अली कॅरेबियन प्रीमियर लीग (सीपीएल) 2020 मध्ये विजयी संघ ट्रिनबागो नाइट रायडर्सचा भाग होता. दरम्यान, आयपीएल 2020 मध्ये केकेआरने सरासरी कामगिरी केली आहे. आतापर्यंत त्याचा स्टार खेळाडू आंद्रे रसेल देखील आपल्या सर्वोत्तम फॉर्ममध्ये दिसला नाही. केकेआरचा पुढील सामना आज, चेन्नई सुपर किंग्स विरोधात अबू धाबी येथे आयोजित होणार आहे. केकेआरने आजवर खेळलेल्या 4 सामन्यांत 2 विजय आणि 2 पराभवांचा सामना केला आहे. मागील सामन्यात केकेआरला दिल्ली कॅपिटलविरुद्ध पराभवाला सामोरे जावे लागले होते, तर सीएसकेने चमकदार कामगिरीच्या जोरावर पंजाबचा 10 विकेटने दारुण पराभव केला होता.
अशा स्थितीत आयपीएलच्या 21व्या सामन्यात केकेआरची टीम सीएसकेविरुद्ध मैदानात विजयाच्या आशेने मैदानात उतरतील. दरम्यान, कर्णधार दिनेश कार्तिकला फलंदाजीद्वारे काही खास कामगिरी करत नाही, शिवाय त्याच्यावर कर्णधारपदाचाही दबाव स्पष्ट दिसत आहे. आजच्या सामन्यात केकेआर आपल्या फलंदाजी क्रमात काही बदल करू शकते.