Coronavirus: आयपीएलमध्ये परदेशी खेळाडूंच्या समावेशावर फ्रँचायझींनी केली 'ही' मागणी, जाणून घ्या

द न्यू इंडियन एक्स्प्रेसच्या अहवालानुसार फ्रँचायझी विदेशी खेळाडूविना स्पर्धा खेळण्यास उत्सुक नसल्याचे म्हटले आहे. आयपीएल फ्रँचायझींनीची इच्छा आहे की रिक्त स्टेडियममध्ये जरी सामने आयोजित केले गेले तरी ही स्पर्धा कोणत्याही परिस्थितीत आयोजित केली पाहिजे.

आयपीएल (Photo Credit: Getty Images)

आयपीएल (IPL) कधी सुरू होणार? जर तेठरलेल्या तारखेला, 29 मार्च रोजी सुरु झाले तर परदेशी खेळाडू खेळू शकतील काय? शनिवारी मुंबईत आयपीएल गव्हर्निंग कौन्सिलची (IPL Governing Council) बैठक होत असताना प्रत्येकाला या प्रश्नाचे उत्तर शोधत आहेत. या बैठकीला बीसीसीआयचे पदाधिकारी आणि आयपीएलचे जीसी चे अध्यक्ष ब्रिजेश पटेल (Brijesh Patel) यांच्याखेरीज सर्व फ्रँचायझी आणि प्रसारक उपस्थित असतील. कोरोना व्हायरसचा (Coronavirus) जगभरातील क्रीडा स्पर्धांवर परिणाम होत असल्याने आयपीएल संदर्भात काही कठीण निर्णय घेतले जाऊ शकतात. भारत सरकार काही अपवाद वगळता सर्व पर्यटक व्हिसा निलंबित 15 एप्रिल पर्यंत निलंबित केल्याने परदेशी खेळाडूंचा समावेश होण्यात शंका निर्माण झाली आहे. शिवाय, यंदा आयपीएल रिक्त स्टेडियममध्ये, प्रेक्षकांविना आयोजित केले जाण्याचीही शक्यता आहे. (दिल्ली सरकारकडून कोरोना व्हायरसमुळे राज्यात IPL 2020 चे आयोजन रद्द, मनीष सिसोदिया यांनी केले जाहीर)

मात्र, द न्यू इंडियन एक्स्प्रेसच्या अहवालानुसार फ्रँचायझी विदेशी खेळाडूविना स्पर्धा खेळण्यास उत्सुक नसल्याचे म्हटले आहे. आयपीएल फ्रँचायझींनीची (IPL Franchise) इच्छा आहे की रिक्त स्टेडियममध्ये जरी सामने आयोजित केले गेले तरी ही स्पर्धा कोणत्याही परिस्थितीत आयोजित केली पाहिजे. रिकाम्या स्टेडियममध्ये सामन्याचे ओझं ते सहन करू शकतात, परंतु परदेशी खेळाडूंनी कोणत्याही परिस्थितीत या स्पर्धेचा भाग असावाअशी त्यांची मागणी आहे. म्हणजेच आयपीएलला 15 एप्रिलपर्यंत पुढे ढकलले जाऊ शकते. दरम्यान, भारत सरकारच्या व्हिसा सस्पेंशनच्या निर्णयामुळे क्रिकेट विश्वातील प्रमुख परदेशी खेळाडू प्रभावित होतील. पूर्ण यादी पाहा येथे:

चेन्नई सुपर किंग्स: ड्वेन ब्राव्हो, सैम कुर्रन, फाफ डु प्लेसिस, लुंगी एनगीडी, जोश हेजलवुड, इम्रान ताहिर, मिशेल सॅटनर, शेन वॉटसन.

दिल्लीची कॅपिटल्स: अ‍ॅलेक्स कॅरी, शिमरोन हेटमेयर, सन्दीप लामिछाने, कगिसो रबाडा, कीमो पॉल, जेसन रॉय, मार्कस स्टोइनिस.

किंग्स इलेव्हन पंजाब: शेल्डन कॉटरेल, क्रिस गेल, क्रिस जॉर्डन, ग्लेन मॅक्सवेल, मुजीब उर रहमान, जेम्स नीशम, निकोलस पूरण, हार्डस विल्जॉईन.

कोलकाता नाइट राइडर्स: टॉम बैंटन, पॅट कमिन्स, लॉकी फर्ग्यूसन, क्रिस ग्रीन, हैरी गर्ने, इयन मॉर्गन, सुनील नरेन, आंद्रे रसेल.

मुंबई इंडियन्स: ट्रेंट बोल्ट, क्विंटन डी कॉक, नाथन कल्टर-नील, क्रिस लिन, मिशेल मैक्लेनाघन, लसिथ मलिंगा, किरॉन पोलार्ड, शेरफेन रदरफोर्ड.

राजस्थान रॉयल्स: जोफ्रा आर्चर, जोस बटलर, टॉम कर्रन, डेविड मिलर, स्टीव स्मिथ, बेन स्टोक्स, ओशाने थॉमस, एंड्रयू टाई.

रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर: मोईन अली, एबी डिव्हिलियर्स, आरोन फिंच, क्रिस मॉरिस, जोश फिलिप, केन रिचर्डसन, डेल स्टेन, इसुरु उडाना.

सनरायझर्स हैदराबाद: फेबियन एलन, जॉनी बेयरस्टो, मिशेल मार्श, मोहम्मद नबी, राशिद खान, बिली स्टॅनलेक, डेव्हिड वॉर्नर, केन विल्यमसन.

कोरोना व्हायरस चा परिणाम असा झाला असल्याने क्रीडा मंत्रालयाने सर्व राष्ट्रीय क्रीडा महासंघ आणि बीसीसीआयला कोणत्याही खेळाच्या कार्यक्रमात सार्वजनिक मेळावा होणार नाही याची काळजी घेण्याचा सल्ला दिला आहे.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now