Dwayne Bravo Ruled Out of IPL 2020: चेन्नई सुपर किंग्जच्या अडचणीत आणखी भर; दुखापतीमुळे ड्वेन ब्राव्हो आयपीएलमधून बाहेर

आयपीएलच्या तेराव्या हंगामात (IPL 2020) अनपेक्षित कामगिरी करणाऱ्या चेन्नई सुपर किंग्ज (Chennai Super Kings) संघाच्या अडचणीत आणखी भर पडली आहे.

एमएस धोनी आणि ड्वेन ब्रावो शर्यत (Photo Credit: Getty)

आयपीएलच्या तेराव्या हंगामात (IPL 2020) अनपेक्षित कामगिरी करणाऱ्या चेन्नई सुपर किंग्ज (Chennai Super Kings) संघाच्या अडचणीत आणखी भर पडली आहे. चेन्नईच्या संघाचा अष्टपैलू खेळाडू ड्वेन ब्राव्हो (Dwayne Bravo) दुखापतीमुळे आयपीएलमधून बाहेर पडला असून लवकरच तो आपल्या घरी परतणार आहे, अशी माहिती चेन्नईचा संघाचा मुख्य कार्यकारी अधिकारी काशी विश्वनाथन (CSK CEO, Kasi Viswanathan) यांनी दिली आहे. यामुळे तेराव्या हंगामात चेन्नईचे आव्हान जवळपास संपुष्टात आल्यात जमा आहे.

दिल्ली डेअरडेविल्स विरुद्ध सामन्यात खेळत असताना ब्राव्होला दुखापत झाली होती. यामुळे या सामन्याच्या अखेरच्या षटकामध्ये 17 धावा वाचवायच्या असताना ब्राव्हो ऐवजी रविंद्र जाडेजाला गोलंदाजी करावी लागली होती. यानंतर चेन्नईच्या संघ व्यवस्थापनाने राजस्थानविरुद्धच्या सामन्यात ब्राव्होला विश्रांती दिली होती. परंतु, ब्राव्होला गंभीर दुखापत झाली असून त्याने स्पर्धेतून माघार घेण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती काशी विश्वनाथन यांनी दिली आहे. तसेच लवकरच तो आपल्या मायदेशी जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले आहे. हे देखील वाचा-How to Download Hotstar & Watch KKR Vs RCB Live Match: कोलकाता नाईट राईडर्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर यांच्यातील लाईव्ह सामना पाहण्यासाठी हॉटस्टार डाउनलोड कसे करावे? इथे पाहा

ट्वीट-

आयपीएलचे तीन किताब जिंकणारा चेन्नईचा संघ या हंगामात संघर्ष करताना दिसला आहे. या हंगामात चेन्नईने 10 सामने खेळले असून त्यापैकी केवळ 3 सामन्यात त्यांना यश मिळाले आहे. तर, 7 सामन्यात पराभव पत्कारावा लागला आहे. चेन्नईच्या संघाचे आता 4 सामने शिल्लक आहेत आणि प्ले ऑफमध्ये पोहोचण्याच्या आशा देखील कमी झाल्या आहेत. यामुळे राहिलेल्या चारही सामन्यात चैन्नईच्या संघाला सर्वोत्तम कामगिरी करून दाखवावी लागणार आहे.