IPL 2020: MI विरुद्ध आयपीएल सामन्यापूर्वी दिनेश कार्तिकने इयन मॉर्गनकडे सोपवली KKR कर्णधारपदाची जबाबदारी, 'हे' सांगितले कारण
पण या सामन्यापूर्वी नाईट रायडर्सच्या संघात मोठा बदल झाला आहे. सध्याचा कर्णधार दिनेश कार्तिकने कर्णधारपदाची जबाबदारी इयन मॉर्गनकडे सोपविला असल्याचे संघ व्यवस्थापनाने उघड केले आहे. कार्तिकने फलंदाजीवर लक्ष केंद्रित करण्यासाठी कर्णधारपद इयन मॉर्गनकडे सोपवले आहे.
इंडियन प्रीमिअर लीगच्या (Indian Premier League) 32व्या सामन्यात मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) आणि कोलकाता नाईट रायडर्स (Kolkata Knight Riders) यांच्या लढत होणार आहे. पण या सामन्यापूर्वी नाईट रायडर्सच्या संघात मोठा बदल झाला आहे. सध्याचा कर्णधार दिनेश कार्तिकने (Dinesh Karthik) कर्णधारपदाची जबाबदारी इयन मॉर्गनकडे (Eoin Morgan) सोपविला असल्याचे संघ व्यवस्थापनाने उघड केले आहे. नाईट रायडर्सने एका निवेदनात म्हटले की, “दिनेश कार्तिकने केकेआर (KKR) व्यवस्थापनाला सांगितले आहे की त्याने फलंदाजीवर लक्ष केंद्रित करण्यासाठी आणि संघाच्या उद्देशासाठी कामगिरी करण्यासाठी कर्णधारपद इयन मॉर्गनकडे सोपवले आहे.” यंदाच्या आयपीएलमध्ये कार्तिकने आजवर फक्त एका सामन्यात अर्धशतक झळकावले आहे. तथापि, कोलकाता संघाने आजवर सात पैकी चार सामने जिंकून पॉईंट्स टेबलमध्ये चौथे स्थान मिळवले आहे. गौतम गंभीर 2018 मध्ये दिल्ली कॅपिटल्समध्ये सामील झाल्यानंतर कार्तिकने कोलकाता फ्रेंचायझीची जबाबदारी स्वीकारली होती. (Sunil Narine Bowling Action: KKRच्या सुनील नारायणची बॉलिंग अॅक्शन बेकायदेशीर, पुन्हा आढळल्यास आयपीएल 2020 मध्ये गोलंदाजी करण्यापासून होईल निलंबित)
कार्तिकने गेल्या दोन मोसमात कोलकाता संघाचे नेतृत्व केले. केकेआर संघाने 2018 मध्ये प्ले-ऑफ फेरी गाठली होती, तर संघ 2019 हंगामात पाचव्या स्थानावर राहिला होता. यासंदर्भात केकेआर संघाचे मुख्य कार्यकारी अधिकारी वेंकी म्हैसूर म्हणाले की, “डीके सारखा कर्णधार असणं हे आम्हाला भाग्य आहे, जो संघाला नेहमीच पुढे ठेवतो. असा निर्णय घेण्यासाठी धैर्य आवश्यक आहे. आम्हाला त्याच्या निर्णया बसला तरी आम्ही त्याच्या इच्छेचा आदर करतो.” दुसरीकडे, मॉर्गनला नवीन कर्णधार बनवण्याविषयी ते म्हणाले, “आम्ही भाग्यवान आहोत की 2019 वर्ल्ड कप विजयी कर्णधार आणि आमच्या संघाचा उप-कर्णधार इयन मॉर्गन आता संघाचे नेतृत्व करेल. डीके आणि मॉर्गनने संपूर्ण स्पर्धेत एकत्र चांगले काम केले असून आता इयन कर्णधार असल्यामुळे दोघांचीही स्थिती बदलली आहे आणि आम्हाला आशा आहे की हा बदल पूर्वीप्रमाणेच काम करेल.”
इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) 13च्या आजच्या सामन्यात गतविजेते मुंबई इंडियन्ससमोर कोलकाता नाईट रायडर्सचे आव्हान असेल. यापूर्वी जेव्हा दोन्ही संघ आमने-सामने आले होते तेव्हा मुंबईने विजय मिळवला होता. मुंबईचे फॉर्मही चांगला आहे आणि त्यामुळे कोलकातावर त्यांचा वरचष्मा आहे. दुसरीकडे, केकेआरला अद्याप विशेषत: त्यांच्या फलंदाजीमध्ये योग्य संयोजन सापडलेले नाही. सलाम जोडी त्याला अजून मजबूत सापडली नाही. कार्तिकच्या नेतृत्वात केकेआरने खेळलेल्या 7 पैकी 4 सामने जिंकले आहेत आणि 8 गुणांसह गुणतालिकेत चौथ्या क्रमांकावर आहे.