IPL 2020 Dates Announced: आयपीएलची तारीख निश्चित! अध्यक्ष ब्रिजेश पटेल यांची मोठी घोषणा, 19 सप्टेंबर रोजी पहिला सामना तर 8 नोव्हेंबरला होणार फायनल
इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल)स्पर्धेच्या 2020 आवृत्तीच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. लीग अध्यक्ष ब्रिजेश पटेल यांनी यंदा आयपीएल स्पर्धा संयुक्त अरब अमिरातीत (युएई) आयोजित केले जाणार असल्याचे यापूर्वी जाहीर केले होते. आणि आता 19 सप्टेंबर ते 8 नोव्हेंबर दरम्यान ही स्पर्धा खेळली जाईल याची पुष्टीही पटेल यांनी केली.
इंडियन प्रीमियर लीग (Indian Premier League) स्पर्धेच्या 2020 आवृत्तीच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. लीग अध्यक्ष ब्रिजेश पटेल (Brijesh Patel_ यांनी यंदा आयपीएल स्पर्धा संयुक्त अरब अमिरातीत (United Arab Emirates) आयोजित केले जाणार असल्याचे यापूर्वी जाहीर केले होते. आणि आता 19 सप्टेंबर ते 8 नोव्हेंबर दरम्यान ही स्पर्धा खेळली जाईल याची पुष्टीही पटेल यांनी केली. याबाबत आठ फ्रँचायझींना कळवण्यात आले आहे. कोरोना व्हायरसच्या प्रकरणांमुळे युएईतील नंबर कमी असल्याने ते एक आदर्श ठिकाण मानले जात होते. आयपीएल 13 साठी भारत प्रथम पसंती होती, परंतु कोरोना व्हायरसच्या वाढत्या घटनांमुळे स्पर्धा आयपीएल बाहेर होणे निश्चित झाले होते. PTIशी बोलताना पटेल यांनी तारखा आणि स्थान निश्चित केले. “इंडियन प्रीमियर लीग युएईमध्ये (UAE) 19 सप्टेंबर ते 8 नोव्हेंबर दरम्यान होणार आहे.” कॅरिबियन प्रीमियर लीग 10 सप्टेंबर रोजी संपणार आहे, तर इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियाचे खेळाडू 15 सप्टेंबरपर्यंत इंग्लंडमध्ये मालिका खेळतील. (IPL 2020: आयपीएल यंदा होऊ नये यासाठी माजी ICC अध्यक्ष शशांक मनोहर करत होते प्रयत्न, माजी पाकिस्तानी क्रिकेटर बसित अलीचा धक्कादायक दावा)
आयपीएलसाठी सर्व फ्रॅन्चायसी आणि खेळाडू ऑगस्टमध्ये रवाना होतील. बीसीसीआय अद्याप इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियन बोर्डाशी चर्चा करीत आहे कारण खेळाडूंना पहिल्या काही सामन्यांत मुकावे लागण्याची शक्यता आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये होणारा टी-20 विश्वचषक पुढे ढकलण्याचा निर्णय घेतल्यानंतर आयपीएल होणे निश्चित झाले आहे. दरम्यान, सर्व फ्रॅन्चायझींनी यापूर्वी मागणी केल्याप्रमाणे, प्रत्येक संघाला सराव करण्यासाठी कमीतकमी एक महिन्याचा कालावधी आवश्यक असल्यामुळे 20 ऑगस्टपर्यंत फ्रँचायझी युएईत पोहचतील.
युएईत दुबई, अबू धाबी आणि शारजाह येथे सामने खेळले जाण्याची शक्यता आहे. दुसरीकडे, बीसीसीआयने भारत सरकारकडे लीग युएईत हलवण्यासाठी परवानगी मागितली आहे. शिवाय, जर युएईने विमान सेवा सुरू न केल्यास सर्व चार्टर्ड प्लेनवर अवलंबून असेल. परदेशी खेळाडूंचे त्यांच्या देशांमधून थेट युएईमध्ये उड्डाण केले जाण्याची शक्यता आहे. यंदा आयपीएल 26 सप्टेंबरपासून सुरू होईल अशी शक्यता वर्तवली जात होती, परंतु बीसीसीआयने या वर्षा अखेरीस होणारा ऑस्ट्रेलिया दौरा लक्षात ठेवत एक आठवडा आधी याची तयारी सुरू केली आहे.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)