IPL 2020: बेंगळुरूमध्ये नाही होणार आयपीएलचे सामने? कर्नाटक सरकारने केंद्र सरकारला टूर्नामेंट रद्द करण्यासाठी लिहिले पत्र, जाणून घ्या काय आहे महाराष्ट्राचे मत

बेंगळुरू आणि इतर शहरांमध्ये कोरोना विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी आयपीएल आयोजित करण्यास असमर्थता दर्शविली आहे.

(Photo Credit: IANS)

इंडियन प्रीमियर लीग (Indian Premier League) ) ची 13 वी आवृत्ती चालू होण्यास तीन आठवड्यांपेक्षा कमी वेळ राहिला आहे. 29 मार्चपासून यंदा आयपीएलची (IPL) सुरुवात होणार आहे. मुंबई इंडियन्स (MI) आणि चेन्नई सुपर किंग्ज (CSK) हंगामातील पहिल्या सामन्यात आमने-सामने येतील. पण यंदाच्या स्पर्धेवर संकट दिसत आहे कारण कर्नाटक सरकारने (Karnataka Government( बेंगळुरूमध्ये (Bengaluru) आयपीएलचे आयोजन करण्यास नकार दिला आहे आणि यासाठी राज्य सरकारने मोदी सरकारला एक पत्रही लिहिले आहे. कर्नाटकचे वैद्यकीय शिक्षणमंत्री के. सुधाकर (K Sudhakar) यांनी दिलेल्या माहितीनुसार सोमवारी अमेरिकेच्या प्रवासाचा इतिहास असलेल्या बेंगळुरू स्थित एका व्यक्तीला कोरोनाव्हायरस (Coronavirus) झाल्याची पुष्टी केली. रिपोर्टनुसार, तो रहिवासी अमेरिकेतून परत आल्यापासून 2,666 लोकांच्या संपर्कात आला आहे. त्याला बेंगळुरूच्या राजीव गांधी इन्स्टिट्यूट ऑफ चेस्ट डिजीज (आरजीआयसीडी) येथे स्वतंत्रपणे ठेवण्यात आले आहे, तर बेंगळुरूच्या आयटी कंपन्यांसह सर्व प्राथमिक शाळा बंद केल्या गेल्या आहेत. हे पाहता राज्य सरकारने बेंगळुरू आणि इतर शहरांमध्ये कोरोना विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी आयपीएल आयोजित करण्यास असमर्थता दर्शविली आहे. (COVID- 19: कोरोना व्हायरसचे सावट आता आयपीएल वर सुद्धा? आरोग्य मंत्री राजेश टोपे यांची माहिती)

कर्नाटकचं चॅनल दिग्विजय 24/7 च्या अहवालानुसार कर्नाटक सरकारने बेंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर आयपीएल सामने खेळवण्यास नकार दिला आहे. राज्य सरकारने लिहून यंदा आयपीएल पुढे ढकलण्याची किंवा स्थगिती देण्याची विनंती केली आहे. कोरोना विषाणूचा धोका लक्षात घेता सरकारने मोदी सरकारलाही या संदर्भात एक पत्र लिहिले आहे. विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूचे (आरसीबी) घर आहे. एम चिन्नास्वामी स्टेडियमवर त्यांचे सर्व सामने आयोजित केले जात आहेत. दरम्यान यापूर्वी महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी कोरोनव्हायरसच्या उद्रेकाबद्दल चिंता व्यक्त केली होती आणि आयपीएल नंतर आयोजित करता येईल असे मत व्यक्त केले होते.

दुसरीकडे, इंडियन प्रीमियर लीग 2020 ला स्थगित करण्यासाठी मद्रास उच्च न्यायालयात अर्ज दाखल करण्यात आला आहे. वकील जी. एलेक्स बेन्झिगर यांनी जनहित याचिका दाखल केली असून त्यावर 12 मार्च रोजी न्यायमूर्ती एमएम सुधींद्र आणि कृष्णन रामास्वामी यांच्या खंडपीठाद्वारे सुनावणी होणे अपेक्षित आहे.