KKR vs MI, IPL 2020: दुबईमध्ये कोलकाता नाईट रायडर्सचे भव्य स्वागत, बुर्ज खलिफावर झळकले खेळाडूंचे फोटो, पाहा या आकर्षक रोषणाईची झलक (Watch Video)

बुर्ज खलिफाने एक एलईडी डिस्प्ले सादर केला, ज्यावर केकेआरचे प्लेयर झळकले. कोलकाता नाइट रायडर्सने त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवर व्हिडिओ शेअर केला.

बुर्ज खलिफावर झळकले कोलकाता नाईट रायडर्सखेळाडूंचे फोटो (Photo Credits: Twitter/KKRiders)

कोलकाता नाइट रायडर्स (Kolkata Knight Riders) बुधवार, 23 सप्टेंबर मुंबई इंडियन्सविरुद्ध (Mumbai Indians) सामन्यातून इंडियन प्रीमियर लीगच्या (Indian Premier League) 13 व्या सत्राचा आपला प्रवास सुरू करतील. तथापि, बहुप्रतिक्षित सामन्याअगोदर, पृथ्वीवरील सर्वात उंच इमारतीने 'नाईट रायडर्सचे' भव्य शैलीमध्ये स्वागत केले. दुबईतील बुर्ज खलिफा (Burj Khalifa) इमारत केकेआरसाठी (KKR) जांभळ्या आणि सुवर्ण रंगात रंगली आणि स्पर्धेच्या पहिल्या सामन्यापूर्वी दोनदा आयपीएल (IPL) चॅम्पियनला शुभेच्छा दिल्या. बुर्ज खलिफाने एक एलईडी डिस्प्ले सादर केला, ज्यावर केकेआरचे प्लेयर झळकले. नाइट रायडर्सने त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवर व्हिडिओ शेअर केला. "उद्या फटाक्यांपूर्वी, येथे पाहा कर्टन-रेझर! आम्ही वर, शीर्षस्थानी जाताना थांबणार नाही. #KKR रंगांमध्ये प्रकाश टाकल्याबद्दल बुर्ज खलीफाचे धन्यवाद. आज रात्री युएईत भव्य स्वागत," केकेआरने ट्विट केले. (KKR vs MI, IPL 2020 Live Streaming: कोलकाता नाईट रायडर्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यातील आयपीएल लाईव्ह सामना आणि स्कोर पाहा Disney+ Hotstar वर)

केकेआरचा मालक आणि बॉलिवूड 'बादशाह' शाहरुख खान हा दुबई टुरिझमच्या जाहिरातीमध्येही यापूर्वी झळकला होता. शाहरुखची दुबईमध्ये प्रचंड क्रेझ आहे. नोव्हेंबर महिन्यामध्ये शाहरुखच्या वाढदिवसानिमित्तही बुर्ज खलिफावर विशेष रोषणाई करण्यात आली होती. पाहा बुर्ज खलीफाने केलेल्या या आकर्षक रोषणाईचा व्हिडिओ:

रोहितच्या नेतृत्वातील मुंबई पहिला पराभव विसरुन विजय मिळवू पाहत असेल, तर दिनेश कार्तिकच्या नेतृत्वात कोलकाता विजयी पदार्पण करण्याची इच्छा असेल. 2013 पासून अद्याप एकाही हंगामात सलामीची लढत जिंकता आली नाही. पण कोलकाताविरुद्ध मुंबईने आजवर प्रभावी कामगिरी केली आहे, त्यामुळे आज देखील त्यांच्याकडून विजयी अपेक्षा असेल. दुसरीकडे, युएई येथे मुंबईला संघर्ष करू लागत असल्याने कोलकाताला चार वेळा आयपीएल विजेत्या टीमविरुद्ध यंदा विजय मिळवण्याची संधी असेल. मुंबईचा संघ रोहित आणि अन्य फलंदाजांवर टिकून आहे, तर दोन वेळचा ‘आयपीएल’ विजेता कोलकाता आंद्रे रसेलवर मोठय़ा प्रमाणावर अवलंबून आहे. मागील हंगामात देखील रसेलने कोलकातासाठी सर्वाधिक धावा आणि विकेट घेतल्या होत्या. मात्र, यंदा रसेलबरोबरच इंग्लंडचा वर्ल्ड कप विजेता कर्णधार इयन मॉर्गनच्या फलंदाजीवरही चाहत्यांचे लक्ष असेल. गोलंदाजीत कोलकाताला पॅट कमिन्सकडून सर्वाधिक अपेक्षा असतील. कमिन्स यंदा आयपीएलचा सर्वात महागडा खेळाडू आहे.



संबंधित बातम्या

South Africa vs Pakistan 1st ODI 2024 Live Streaming: आज पहिल्या एकदिवसीय सामन्यात दक्षिण आफ्रिका आणि पाकिस्तान यांच्यात होणार चुरशीची लढत, येथे जाणून घ्या भारतात कधी अन् कुठे पाहणार थेट प्रक्षेपण

IND vs AUS 3rd Test 2024 Day 4 Stumps: बुमराह-आकाशने केला चमत्कार, फॉलोऑनचा धोका टळला; चौथ्या दिवसाअखेर भारताच स्कोर 252/9

Zimbabwe vs Afghanistan ODI Stats: वनडे सामन्यात झिम्बाब्वे आणि अफगाणिस्तान यांच्यात कसा आहे विक्रम, येथे जाणून घ्या हेड टू हेड, सर्वाधिक धावा आणि विकेट घेणारे खेळाडूंची आकडेवारी

IND W vs WI W 2nd T20I 2024 LIVE Streaming: आज मालिका जिंकण्यासाठी भारतीय महिला संघ सज्ज, तर वेस्ट इंडिजचे लक्ष पहिल्या विजयाकडे; त्याआधी जाणून घ्या कधी अन् कुठे पाहणार सामना