IPL 2020: बेन स्टोक्सची आज होणार पहिली COVID टेस्ट, राजस्थान रॉयल्ससाठी मैदानावर उतारण्यावर मिळाला अपडेट
ANI शी बोल. ANI शी बोलताना रॉयल्सच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, स्टोक्सची रविवारी पहिली कोविड टेस्ट होईल आणि सनरायझर्स हैदराबादविरुद्ध पुढच्या रविवार होणाऱ्या लढतीसाठी सज्ज असेल. ताना रॉयल्सच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, स्टोक्सची रविवारी पहिली कोविड टेस्ट होईल आणि सनरायझर्स हैदराबादविरुद्ध पुढच्या रविवार होणाऱ्या लढतीसाठी सज्ज असेल.
इंग्लंडचा अष्टपैलू बेन स्टोक्स (Ben Stokes) रविवारी युएईमध्ये इंडियन प्रीमियर लीग 2020 च्या सध्याच्या आवृत्तीसाठी राजस्थान रॉयल्सच्या (Rajasthan Royals) शिबिरात सामील झाला आहे. ऑगस्टमध्ये पाकिस्तानविरुद्ध कसोटी मालिकेच्या मध्यभागी वैयक्तिक कारणांमुळे स्टोक्स क्रिस्टचर्चला मायदेशी परतला होता. मायदेशी परतल्यामुळे स्टोक्स आयपीएलचा संपूर्ण हंगामाला मुकणार की काय अशी शंका होती. परंतु युएईमध्ये आल्यामुळे अष्टपैलूने शंका दूर केली. बायो-सुरक्षित प्रोटोकॉलनुसार, स्टोक्सला येत्या 6 दिवस क्वारंटाइन रहावे लागणार आहे आणि राजस्थान रॉयल्सच्या आगामी फिक्स्चरांना मुकावे लागेल. आखाती देशात आगमन झाल्याची घोषणा करताना, स्टोक्सने आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवर एक स्टोरी पोस्ट केली ज्यामध्ये त्याने लिहिले, “दुबईत गरमी आहे.” दुसरीकडे, ANI शी बोलताना रॉयल्सच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, स्टोक्सची रविवारी पहिली कोविड टेस्ट होईल आणि सनरायझर्स हैदराबादविरुद्ध पुढच्या रविवार होणाऱ्या लढतीसाठी सज्ज असेल. (RCB vs RR, IPL 2020: आउट की नॉट आउट? संजू सॅमसनच्या विकेटची रंगली चर्चा, अनियंत्रित निर्णयावरून नेटकऱ्यांनी थर्ड अंपायरला सुनावलं Watch Video)
"हॉटेलमध्ये पोहोचताच त्याने क्वारंटाइन कालावधी सुरू केला आहे. आज त्याची पहिली टेस्ट होईल आणि 6 दिवसांचा कालावधी शुक्रवारी संपेल जेव्हा आमी शारजाह येथे दिल्ली कॅपिटल्सशी खेळणार, आम्ही त्याच्याकडे एसआरएचविरुद्ध खेळण्यासाठी पाहत आहोत. तो काही काळ मैदानाबाहेर असल्याने त्याला फॉर्म मिळवण्यासाठीही मदत होईल," अधिकाऱ्याने सांगितले. आजवर झालेल्या चारपैकी दोन सामने गमावल्यामुळे स्टोक्समध्ये संघात सामील होणे रॉयलसाठी खूपच उत्तेजनदायक आहे. मधल्या फळीत स्टोक्सची उपस्थिती रॉयल्ससाठी मोठी उपयोगी ठरेल कारण त्यांचा अन्य विदेशी स्टार आणि सलामी फलंदाज जोस बटलर त्यांना प्रभावी सुरुवात करण्यात अपयशी ठरला आहे ज्यामुळे मधल्या फळीत दबाव पडत आहे.
दरम्यान, स्टोक्स इंग्लंड आणि पाकिस्तान दरम्यान मालिका खेळत असताना त्याच्या वडिलांच्या तब्येतीची माहिती मिळताच तो घरी रवाना झाला होता. "स्टोक्स या आठवड्याच्या शेवटी लंडन सोडून न्यूझीलंडला रवाना होईल. 13 ऑगस्ट आणि 21 ऑगस्टला इंग्लंडच्या पाकिस्तानविरुद्ध दोन कसोटी सामन्यांना त्याला मुकावे लागणार आहे, "ईसीबीने 9 ऑगस्ट रोजी एका प्रसिद्धीपत्रकात म्हटले होते.