Scott Styris Reacts on IPL Points Table: 2020 चा त्रास झाला आहे! RCBने पॉईंट्स टेबलमध्ये अव्वल स्थान गाठल्यावर स्कॉट स्टायरिसने मारला डोक्यावर हात, पाहा Tweet

चेन्नई सुपर किंग्ज आणि न्यूझीलंडचा अष्टपैलू स्कॉट स्टायरिस यांनी आयपीएल 13ची गुणतालिका दर्शवत सोशल मीडियावर मजेदार मेसेज पोस्ट केला.

रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर (Photo Credit: PTI)

Scott Styris Reacts on IPL Points Table: वर्ष 2020 निःसंशयपणे विचित्र आहे. कोरोना व्हायरसपासून सुरक्षित राहण्यासाठी लोकांनी स्वतःला घरामध्ये कैद करून ठेवले आहे. काम करण्याचे प्रकार बदलले आहेत, इतरांशी संवाद साधण्याचा मार्गही बदलला आहे आणि खेळाचे दृश्यही बदलले आहे. जगभरात रिकाम्या स्टेडियममध्ये किंवा स्टेडियमवर काही मोजक्या चाहत्यांच्या उपस्थितीत खेळ खेळला जात आहे. इंडियन प्रीमियर लीगदेखील (Indian Premier League) त्याला अपवाद राहिलेला नाही. आयपीएलने पहिल्या आठवड्यांत आणखीनच आश्चर्यचकित केले असल्याचे दिसुन आले आहे. रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर (Royal Challengers Bangalore) ज्यांनी गेल्या तीन मोसमात 8, 6 व 8वे स्थान मिळविले होते, ते यंदा स्पर्धेतील 15 सामन्यांनंतर आयपीएल 2020 गुणतालिकेत (IPL Points Table) अव्वल स्थानावर, तर चेन्नई सुपर किंग्स (Chennai Super Kings) गुणतालिकेच्या तळाशी आहेत. राजस्थान रॉयल्सविरुद्ध आपला चौथा सामना जिंकून बेंगलोरने गुणतालिकेत पहिले स्थान गाठले. (IPL 2020 Points Table Updated: DC vs KKR आयपीएल सामन्यानंतर पाहा पॉईंट्स टेबलची स्थिती)

चेन्नई सुपर किंग्ज आणि न्यूझीलंडचा अष्टपैलू स्कॉट स्टायरिस (Scott Styris) यांनी आयपीएल 13ची गुणतालिका दर्शवत सोशल मीडियावर मजेदार मेसेज पोस्ट केला. "2020 ने खरोखरच सर्व खराब केले! रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर सध्या आयपीएल गुणतालिकेत अव्वल आहेत आणि चेन्नई सुपर किंग्ज तळाशी आहेत,” स्टायरिसने लिहिले. आयपीएलचे पॉईंट्स टेबल कोणती टीम कशा फॉर्ममध्ये आहे ते दर्शवते. कर्णधार कोहलीने या स्पर्धेत लय मिळवण्यासाठी थोडा वेळ घेतला सला तरी विराट सेनेच्या अन्य खेळाडूंनी पुढाकार घेऊन आपली भूमिका योग्यपणे पार पडली आहे. पाहा स्टायरिसचे ट्विट:

दरम्यान, दिल्ली कॅपिटल्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यातील आयपीएल सामन्यानंतर गुणतालिकेचे समीकरण बदलले. दिल्ली आणि बेंगलोर दोघांचे 6 गुण आहेत, दिल्लीने चांगल्या नेट रन-रेटच्या आधारावर पहिले स्थान मिळवले आणि आरसीबीला दुसऱ्या स्थानी ढकलले. दुसरीकडे, दिल्लीविरुद्ध पराभवानंतर कोलकाता देखील टॉप-4 मधून बाहेर पडली असून त्यांची पाचव्या स्थानी घसरण झाली. दिल्ली आणि बेंगलोरने 4 सामन्यांपैकी प्रत्येकी 3 सामने जिंकले आहेत. तर दोंघांना एका सामन्यात पराभवाला सामोरे जावे लागले आहे.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif