IPL 2019 मध्ये सनरायझर्स हैद्राबाद संघाला निरोप देताना डेव्हिड वॉर्नर याची भावूक पोस्ट (Watch Video)

ऑस्ट्रेलिया संघाचा डेव्हिड वॉर्नर इंडियन प्रिमियर लीगमध्ये सनरायजर्स हैद्राबाद संघात विशेष कामगिरी करुन आता मायदेशी परतत आहे.

David Warner of Sunrisers Hyderabad (Photo Credits: IANS)

ऑस्ट्रेलिया संघाचा डेव्हिड वॉर्नर (David Warner) इंडियन प्रिमियर लीगमध्ये (Indian Premier League) सनरायजर्स हैद्राबाद (Sunrisers Hyadrabad) संघात विशेष कामगिरी करुन आता मायदेशी परतत आहे. या निमित्ताने त्याने खास मेसेज क्रिकेटप्रेमींसोबत शेअर केला आहे. किंग्स इलेव्हन पंजाब संघाविरुद्ध काल झालेला सामना त्याचा शेवटचा सामना ठरला. आता तो वर्ल्ड कपसाठी मायदेशी रवाना होत आहे. पंजाब विरुद्धच्या अखेरच्या सामन्यात विजय मिळवल्यानंतर समाधानी मनाने त्याने सहकाऱ्यांचा निरोप घेतला.

या सामन्यानंतर वॉर्नरने इंस्टाग्रामवर भावूक पोस्ट लिहिली. त्यात त्याने लिहिले की, "सनरायजर्स संघाने दिलेल्या पाठींब्याबद्दल खूप आभारी आहे. फक्त या सीजनमध्येच नाही तर गेल्या वर्षीही असाच पाठींबा मिळाला होता. या संघाकडून खेळण्यासाठी मला वाट पाहावी लागली. मात्र पुन्हा एकदा या सर्वांमध्ये येऊन मला छान वाटले. संघ मालक, साहाय्यक खेळाडू, सहकारी, सोशल मीडिया टीम आणि चाहते या सर्वांचे खूप खूप आभार. त्यांनी दाखवलेल्या विश्वासावर मी खरा उतरलो, याचा आनंद आहे.. पुढील वाटचालीसाठी संघाला शुभेच्छा.''

वॉर्नरची पोस्ट:

वॉर्नरचा एक व्हिडिओ देखील समोर येत आहे. या व्हिडिओ टीममेट भुवनेश्वर कुमारने शूट केला आहे.

पहा व्हिडिओ:

आयपीएलच्या 12 व्या हंगामात वॉर्नरने तब्बल 692 धावा केल्या. त्यात एका शतकासह 8 अर्धशतकांचा समावेश आहे.



संबंधित बातम्या

PAK vs SA 1st ODI 2024 Mini Battle: पाकिस्तान विरुद्ध दक्षिण आफ्रिका, पहिल्या वनडेच्या मिनी बॅटलमध्ये होणार चुरशीची स्पर्धा, हे खेळाडू सामन्याचा निर्णय बदलू शकतात

PAK vs SA 1st ODI 2024 Preview: पाकिस्तान विरुद्ध दक्षिण आफ्रिका पहिला एकदिवसीय सामना पार्लमध्ये खेळला जाणार, सामन्यापूर्वी हेड टू हेड रेकॉर्ड, मिनी बॅटल, स्ट्रीमिंगसह सर्व तपशील घ्या जाणून

West Indies vs Bangladesh, 2nd T20I Match Live Streaming In India: वेस्ट इंडिज आणि बांगलादेश यांच्यात रंगणार हाय व्होल्टेज सामना, जाणून घ्या भारतात थेट प्रक्षेपण कधी, कुठे आणि कसे पाहाल

Pushpa 2 Premiere Tragedy: हैदराबाद येथे झालेल्या चेंगराचेंगरीत जखमी झालेल्या श्री तेज यांच्याबाबत अल्लू अर्जुनचे वक्तव्य, म्हणाले- 'मी त्याच्या प्रकृतीबद्दल अत्यंत चिंतेत आहे'