Chris Gayle चा 'आयपीएल' मध्ये विक्रम! 300 षटकार ठोकणारा एकमेव खेळाडू
ख्रिस गेल या वेस्ट इंडिज खेळाडूने आजच्या सामन्यात 300 वा षटकार ठोकत आयपीएलमध्ये नवा विक्रम रचला आहे.
ख्रिस गेलचा (Chris Gayle) आयपीएलमधील झंझावाती खेळ आजही पाहायला मिळाला. पंजाबच्या होमपीचवर आज मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) विरुद्ध किंग्स इलेव्हन पंजाब हा सामना रंगला. ख्रिस गेल या वेस्ट इंडिज खेळाडूने आजच्या सामन्यात 300 वा षटकार ठोकत आयपीएलमध्ये नवा विक्रम रचला आहे. 300 षटकार ठोकणारा गेलं हा पहिला खेळाडू आहे. त्याच्या या विक्रमाच्या आसपासही इतर खेळाडू नाही. IPL 2019 Full Schedule: 23 मार्च ते 5 मे दरम्यान रंगणार्या VIVO IPL 12 चे वेळापत्रक PDF स्वरूपात पहा आणि डाऊनलोड करा; जाणून घ्या कधी, कुठे रंगणार आयपीएलचे सामने
ख्रिस गेलची झंझावाती खेळी
आयपीएलमध्ये एकाही फलंदाजाच्या नावावर अजून 200 षटकारही नाहीत. गेल खालोखाल एबी डिव्हीलियर्सने 193 षटकार ठोकले आहेत. ख्रिस गेल आयपीएलमध्ये एकूण 115 सामने खेळला आहे.
आज पंजाब टीमच्या गोलंदाजांनी केलेल्या दमदार कामगिरीमुळे मुंबईला अवघ्या 175 धावांवर रोखणं शक्य झालं. मुंबईवर पंजाबने आज 8 गडी राखून विजय मिळवला आहे.