Pragyan Ojha Retires: टीम इंडियाचा फिरकी गोलंदाज प्रज्ञान ओझा निवृत्त, सचिन तेंडुलकरच्या शेवटच्या कसोटीत घेतल्या होत्या 10 विकेट्स
भुवनेश्वर येथील रहिवासी ओझाने आपल्या ट्विटर अकाऊंटवर दोन पानांचे पत्र लिहून याबाबत माहिती दिली आहे. यात त्याने आपल्या टीमचे माजी कर्णधार आणि सहकार्यांचे आभार मानले आहेत. या पत्राच्या कॅप्शनमध्ये ओझाने जीवनाच्या पुढच्या टप्प्यावर जाण्याची वेळ आली आहेअसे लिहिले आहे.
टीम इंडियाचा (India) डावखुरा फिरकीपटू प्रग्यान ओझा (Pragyan Ojha) ने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. भुवनेश्वर येथील रहिवासी ओझाने आपल्या ट्विटर अकाऊंटवर दोन पानांचे पत्र लिहून याबाबत माहिती दिली आहे. यात त्याने आपल्या टीमचे माजी कर्णधार आणि सहकार्यांचे आभार मानले आहेत. या पत्राच्या कॅप्शनमध्ये ओझाने जीवनाच्या पुढच्या टप्प्यावर जाण्याची वेळ आली आहेअसे लिहिले आहे. "प्रेम आणि पाठिंबा देणार्या प्रत्येक व्यक्तीची मी नेहमी आठवण ठेवेन आणि मला त्यापासून नेहमीच प्रेरणा मिळेल," प्रज्ञानने लिहिले. ओझाने भारताकडून 24 कसोटी, 18 वनडे आणि 6 आंतरराष्ट्रीय टी-20 सामने खेळले आहेत. कसोटी क्रिकेटमधील त्याचा रेकॉर्ड खूप प्रभावी होता. यात ओझाने 30.26 च्या सरासरीने 113 विकेट्स घेतल्या, ज्यात सात डावांमध्ये पाच किंवा त्याहून अधिक विकेट्सचा समावेश आहे. टेस्टमध्ये दहा किंवा त्यापेक्षा जास्त विकेट्स घेण्यातही ओझा यशस्वीही झाला. 47 धावा देऊन 6 विकेट्स ही ओझाच्या कसोटी मॅचच्या डावातील कामगिरी राहिली आहे.
ओझाने 2008 मध्ये भारताच्या वनडे संघात पदार्पण केले होते. ज्यानंतर 2013 पर्यंत तिन्ही फॉर्मेट सामन्यात त्याने भारतीय संघाचे प्रतिनिधित्व केले. सर्वात जलद 100 विकेट घेणारा वेगवान भारतीय गोलंदाज असूनही, ओझाच्या एकावेळी बॉलिंग ऍक्शनबद्दल नेहमीच प्रश्न उपस्थित होत होते. 2013 मध्ये टीम इंडियासाठी त्याने अखेरचा सामना खेळला होता.
संशयित गोलंदाजी क्रियेमुळे भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) 2014 मध्ये ओझाला गोलंदाजीवर बंदी घातली होती. बीसीसीआयने ओझाच्या होम स्टेट असोसिएशन हैदराबादला अधिकृतपणे त्याची गोलंदाजीची कृती सुधारण्याची गरज असल्याचीमाहिती दिली होती. प्रग्यानने वनडे सामन्यात 21, तर आंतरराष्ट्रीय टी-20 सामन्यात त्याने सहा सामन्यांत 10 विकेट मिळवल्या आहेत. ओझाने मुंबई येथे 14 ते 16 नोव्हेंबर दरम्यान शेवटचा कसोटी सामना खेळला. सचिन तेंडुलकरच्या आंतरराष्ट्रीय कारकीर्दीचा आणि 200 वा आणि अखेरचा कसोटी सामना होता. या सामन्यात ओझाने पहिल्या डावात 40 धावा देऊन पाच तर दुसऱ्या डावात 49 धावा देऊन पाच गडी बाद केले होते.