IND vs SL 1st T20 Live Streaming Online: नवीन वर्षात मोठ्या बदलांसह भारतीय संघ उतरणार मैदानात, कधी आणि कुठे पाहणार सामना घ्या जाणून

रोहित शर्मा, विराट कोहली, केएल राहुलसारख्या वरिष्ठ खेळाडूंशिवाय, हार्दिक पंड्याच्या नेतृत्वाखाली युवा खेळाडूंसह टी-20 मालिकेत भारत श्रीलंकेचा सामना करेल.

Team India (Photo Credit - Twitter)

IND vs SL 1st T20: टीम इंडिया (Team India) थोड्या विश्रांतीनंतर 2023 मध्ये आपल्या व्यस्त क्रिकेट वेळापत्रकात परतणार आहे. बांगलादेशविरुद्धच्या कसोटी मालिकेतील विजयानंतर भारतीय खेळाडूंना छोटा ब्रेक मिळाला होता, मात्र आता 3 जानेवारी 2023 पासून खेळाडूंचे व्यस्त वेळापत्रक पुन्हा एकदा श्रीलंका मालिकेपासून (IND vs SL) सुरू होणार आहे. नवीन वर्षात मोठ्या बदलांसह, भारतीय क्रिकेट संघ 3 जानेवारी 2023 पासून म्हणजे आजपासुन श्रीलंकेविरुद्ध 3 सामन्यांच्या टी-20 मालिकेने सुरुवात करणार आहे. रोहित शर्मा, विराट कोहली, केएल राहुलसारख्या वरिष्ठ खेळाडूंशिवाय, हार्दिक पंड्याच्या नेतृत्वाखाली युवा खेळाडूंसह टी-20 मालिकेत भारत श्रीलंकेचा सामना करेल. तसेच हा सामना तुम्ही कधी आणि कुठे पाहू शकतात या बद्दल जाणून घ्या...( हे देखील वाचा: IND vs SL 1st T20: पहिल्या टी-20 मध्ये कर्णधार हार्दिक पांड्या घेणार मोठा निर्णय, 'या' मोठ्या खेळाडूला ठेवणार बाहेर)

भारत आणि श्रीलंका यांच्यातील पहिला टी-20 सामना कधी आणि कुठे खेळवला जाणार आहे?

भारत आणि श्रीलंका यांच्यातील पहिला टी-20 सामना 3 जानेवारीला म्हणजे आज होणार आहे आणि हा सामना मुंबईतील वानखेडे मैदानावर खेळवला जाणार आहे.

पहिला टी-20 सामना किती वाजत खेळवला जाणार आहे?

भारत विरुद्ध श्रीलंका पहिला टी-20 सामना भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 7 वाजता खेळवला जाणार आहे तसेच 6.30 वाजता नाणेफेक होईल.

भारत आणि श्रीलंका यांच्यातील टी-20 मालिकेचे थेट प्रक्षेपण तुम्ही कोणत्या चॅनलवर पाहू शकता?

तुम्ही स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर भारत आणि श्रीलंका यांच्यातील टी-20 मालिकेचे थेट प्रक्षेपण पाहू शकता. तुम्ही स्टार स्पोर्ट्स 1, स्टार स्पोर्ट्स 1 एचडी, स्टार स्पोर्ट्स 1 हिंदी, स्टार स्पोर्ट्स 1 हिंदी एचडी, स्टार स्पोर्ट्स फर्स्ट, स्टार स्पोर्ट्स 1 तमिळ, स्टार स्पोर्ट्स 1 तेलुगु, स्टार स्पोर्ट्स 1 कन्नड वर भारत विरुद्ध श्रीलंका हा सामना पाहू शकतात

भारत आणि श्रीलंका यांच्यातील टी-20 मालिकेचे लाइव्ह स्ट्रीमिंग तुम्ही कुठे पाहू शकतात?

भारत आणि श्रीलंका यांच्यातील टी-20 मालिकेचे लाइव्ह स्ट्रीमिंग तुम्ही Disney+Hotstar अॅप आणि वेबसाइटवर पाहता येईल.

भारत आणि श्रीलंका यांच्यातील टी-20 मालिकेचे थेट प्रक्षेपण तुम्ही विनामूल्य कुठे पाहू शकता?

डीडी फ्री डिश प्लॅटफॉर्मद्वारे डीडी स्पोर्ट्सवर भारत आणि श्रीलंका (IND vs SL) यांच्यातील T20 मालिकेचे थेट प्रक्षेपण तुम्ही विनामूल्य पाहू शकता.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement