IND vs BAN 2nd Test Kanpur: बांगलादेशच्या जबरा चाहत्यांसोबत भारतीय चाहत्यांची हाणामारी, नंतर पोलिसांना सापडला या अवस्थेत…पाहा व्हिडिओ
कानपूरमध्ये बांगलादेशी चाहत्यावर हल्ला केल्याची घटना समोर आली आहे. काही भारतीय चाहत्यांनी बांगलादेशी तरुणाला मारहाण करून जखमी केले आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
IND vs BAN 2nd Test 2024: भारत आणि बांगलादेश यांच्यातील कसोटी मालिकेतील दुसरा सामना (IND vs BAN 2nd Test 2024) कानपूरच्या ग्रीन पार्क स्टेडियमवर (Kanpur, Green Park) खेळवला जात आहे. जिथे बांगलादेशी चाहत्यावर हल्ला केल्याची घटना समोर आली आहे. काही भारतीय चाहत्यांनी बांगलादेशी तरुणाला मारहाण करून जखमी केले आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मात्र, हल्ल्याबाबत अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. (हे देखील वाचा: IND vs BAN 2nd Test Day 1 Stumps: पावसामुळे पहिल्या दिवसाचा खेळ वाया, बांगलादेशचा स्कोअर 107/3; आकाश दिपने घेतल्या दोन विकेट)
VIDEO | Bangladesh cricket team's 'super fan' Tiger Roby was allegedly beaten up by some people during the India-Bangladesh second Test match being played at Kanpur's Green Park stadium. He was taken to hospital by the police. More details are awaited.#INDvsBAN #INDvsBANTEST… pic.twitter.com/n4BXfKZhgy
— Press Trust of India (@PTI_News) September 27, 2024
ढाका येथील टायगर रॉबी (Tiger Roby) नावाचा बांगलादेशी चाहता भारत आणि बांगलादेश यांच्यातील कसोटी मालिकेतील दुसरा सामना पाहण्यासाठी कानपूरला पोहोचला होता. यादरम्यान मैदानावरील भारतीय चाहत्यांशी बाचाबाची झाली. त्यानंतर भारतीय चाहत्यांनी टायगर रॉबीला ढकलून ध्वज हिसकावला. रॉबीने याला विरोध केल्यावर भारतीय चाहत्यांनी त्याला बेदम मारहाण केली.
प्रकरण चिघळत असल्याचे पाहून तेथे उपस्थित अन्य भारतीय चाहत्यांनी हस्तक्षेप केला. या प्रकरणाची माहिती मिळताच पोलीस प्रेक्षक स्टँडवर पोहोचले. जिथे रॉबी वेदनेने ओरडताना दिसला. त्यानंतर रॉबीला रुग्णालयात पाठवण्यात आले. या घटनेची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे.
(The above story first appeared on LatestLY on Sep 27, 2024 03:52 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

