IND vs BAN 2nd Test Day 1 Stumps: पावसामुळे पहिल्या दिवसाचा खेळ वाया, बांगलादेशचा स्कोअर 107/3; आकाश दिपने घेतल्या दोन विकेट
भारताने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि वेगवान गोलंदाज आकाशदीपने भारताला चांगली सुरुवात करून दिली. मात्र, लंच ब्रेकनंतर नऊ षटके राहिल्यानंतर आजचा खेळ पाऊस आणि खराब प्रकाशामुळे रद्द घोषित करण्यात आला.
India National Cricket Team vs Bangladesh National Cricket Team Match: भारतीय राष्ट्रीय क्रिकेट संघ (India National Cricket Team) आणि बांगलादेश राष्ट्रीय क्रिकेट संघ (Bangladesh National Cricket Team) यांच्यात दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसरा सामन्याला आजपासून सुरुवात झाली आहे. हा सामना कानपूरच्या ग्रीन पार्क स्टेडियमवर खेळवला जात आहे. टीम इंडिया सध्या मालिकेत 1-0 ने आघाडीवर आहे. दरम्यान, पहिल्या दिवशी पाऊस आणि ओले मैदान यामुळे टॉसला उशीर झाला. त्यानंतर भारताने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि वेगवान गोलंदाज आकाशदीपने भारताला चांगली सुरुवात करून दिली. मात्र, लंच ब्रेकनंतर नऊ षटके झाल्यानंतर पहिल्या दिवसाचा खेळ पाऊस आणि खराब प्रकाशामुळे रद्द घोषित करण्यात आला. पहिल्या दिवशी बांगलादेश 3 विकेट गमावून 107 धावांवर आहे. तर भारताकडून आकाश दीपने दोन विकेट घेतल्या आहे.
UPDATE 🚨
Due to incessant rains, play on Day 1 has been called off in Kanpur.
Scorecard - https://t.co/JBVX2gyyPf#TeamIndia | #INDvBAN | @IDFCFIRSTBank pic.twitter.com/HSctfZChvp
— BCCI (@BCCI) September 27, 2024
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Sep 27, 2024 03:25 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

