Sarfaraz Khan: सर्फराझ खानच्या घरी छोट्या पाहुण्याचे आगमन; पत्नी रोमना जहूरने दिला मुलाला जन्म, इन्स्टा स्टोरीवर फोटो शेअर दिली माहिती

सर्फराझने इन्स्टा स्टोरीवर दोन फोटो शेअर केले आहेत. एका फोटोत तो आपल्या बाळासोबत दिसत असून तो मुलगा असल्याचे लिहिले आहे, तर दुसऱ्या फोटोत तो वडील आणि बाळासोबत दिसत आहे.

Sarfaraz Khan: सर्फराझ खानच्या घरी छोट्या पाहुण्याचे आगमन; पत्नी रोमना जहूरने दिला मुलाला जन्म, इन्स्टा स्टोरीवर फोटो शेअर दिली माहिती
Photo Credit- X

Sarfaraz Khan Becomes Father: बंगळुरू कसोटी सामन्यात न्यूझीलंडविरुद्ध दमदार खेळी करणाऱ्या सर्फराझ खानला(Sarfaraz Khan) आनंदाची बातमी मिळाली आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील पहिले शतक झळकावल्याच्या दोन दिवसांनंतर सोमवारी त्याच्या घरी छोट्या पाहुण्याचे आगमन झाले आहे. तो बापमाणूस झाला आहे. त्यांची पत्नी रोमना जहूरने मुलाला जन्म दिला आहे. याबाबत स्वतः सर्फराझ खानने त्याच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर फोटो शेअर करुन माहिती दिली आहे. सर्फराझ खान आणि रोमना जहूर यांचे गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये लग्न झाले होते.

सर्फराझ खान आणि त्याच्या कुटुंबासाठी गेले काही दिवस चढ-उताराचे होते. मात्र, वाईट काळही निघून जातो. आता त्याच्या घरी आनंदी-आनंद पहायला मिळत आहे. सर्फराझने इन्स्टा स्टोरीवर दोन फोटो शेअर केले आहेत. एका फोटोत तो आपल्या बाळासोबत दिसत असून तो मुलगा असल्याचे लिहिले आहे, तर दुसऱ्या फोटोत तो वडील आणि बाळासोबत दिसत आहे. (INDIA A vs UAE Match Highlights: युएईचा 7 विकेट्सने पराभव करत भारत अ चा उपांत्य फेरीत प्रवेश; अभिषेक शर्माच्या 24 चेंडूत 58 धावा, पहा हायलाइट्स)

या वर्षाच्या सुरुवातीला कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या सर्फराझ खानला बंगळुरू कसोटी सामन्याच्या पहिल्या डावात आपले खाते उघडता आले नाही, परंतु दुसऱ्या डावात 150 धावा करून टीम इंडियाचे पुनरागमन केले. मात्र, त्यानंतरच्या फलंदाजांना फारशा धावा करता आल्या नाहीत. त्यामुळे भारतानेन्यूझीलंडला 107 धावांचे लक्ष्य दिले, जे त्यांनी दोन गडी गमावून सहज पूर्ण करत ऐतिहासिक विजय मिळवला.

मुलासोबतचा फोटो शेअर

सर्फराझचा धाकटा भाऊ मुशीर खान आणि वडील नौशाद खान यांचा कार अपघात झाला होता. ज्यात भाऊ मुशीर खान जखमी झाला, सुदैवाने वडील नौशाद सुरक्षित राहिले. सर्फराझ खानने या सामन्यात खेळताना द्विशतक झळकावले. असे असूनही त्याला भारतीय संघात स्थान मिळत नव्हते. शुबमन गिल मानदुखीच्या त्रासामुळे बाहेर झाला, तेव्हा त्याला पुन्हा कसोटी संघात संधी मिळाली.

(The above story first appeared on LatestLY on Oct 22, 2024 12:44 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).