IPL Auction 2025 Live

भारतीय क्रिकेटपटू Rajeshwari Gayakwad हिचे सुपरमार्केटमध्ये भांडण, मित्रांसह कर्मचाऱ्याला केली मारहाण, पहा व्हिडीओ

यावेळी त्यांनी तेथे उपस्थित असलेल्या कर्मचाऱ्यांशी वाद घालण्यास सुरुवात केली.

Rajeshwari Gayakwad (Photo Credit - Twitter)

Karnataka: भारतीय महिला क्रिकेट संघाची फिरकीपटू राजेश्वरी गायकवाड (Rajeshwari Gayakwad) वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. ती कर्नाटकातील (Karnataka) विजयपूर येथील एका सुपरमार्केटमध्ये काही सामान घेण्यासाठी गेली होती. यादरम्यान त्यांचा तेथील कर्मचाऱ्यांशी काही गोष्टीवरून वाद (Altercation) झाला. सुरुवातीला दोघांमध्ये थोडंसं बोलणं झालं, पण नंतर प्रकरण आणखीनच वाढलं. भारतीय महिला क्रिकेटपटूच्या ओळखीच्या लोकांनी येऊन कर्मचाऱ्यांना मारहाण केली. हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.

सुपरमार्केटमध्ये घुसून कर्मचाऱ्यांना मारहाण

राजेश्वरी गायकवाड या सुपरमार्केटमध्ये कॉस्मेटिक वस्तू खरेदी करण्यासाठी गेल्याचे सांगण्यात येत आहे. यावेळी त्यांनी तेथे उपस्थित असलेल्या कर्मचाऱ्यांशी वाद घालण्यास सुरुवात केली. हा प्रकार त्याच्या ओळखीच्या लोकांना समजताच त्यांनी सुपरमार्केटमध्ये घुसून कर्मचाऱ्यांना मारहाण केली. सुपरमार्केटच्या कर्मचार्‍यांनी 31 वर्षीय राजेश्वरीविरुद्ध एफआयआर नोंदवण्याचे ठरवले, परंतु नंतर पोलिसांनी दोन्ही पक्षांची समजूत घातल्यानंतर प्रकरण शांत केले. (हे देखील वाचा: IND vs BAN 2022: बांगलादेशला हरवण्यासाठी भारतीय संघ रवाना, पहा रोहित शर्मा-विराट कोहलीचा स्वॅग)

पहा व्हिडीओ

विश्वचषकात भारतासाठी सर्वोत्तम कामगिरी 

गायकवाडने 2014 मध्ये  भारतासाठी पहिला सामना खेळला होता. राजेश्वरी गायकवाडची सर्वात संस्मरणीय कामगिरी 2017 च्या विश्वचषकात न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात पाहायला मिळाली, जेव्हा तिने 15 धावांत 5 विकेट घेतल्या होत्या. वनडेतील कोणत्याही भारतीय महिला गोलंदाजाची ही सर्वोत्तम कामगिरी आहे. गायकवाड यांनी भारतासाठी 64 एकदिवसीय आणि 44 टी-20 सामने खेळले आहेत. तिने वनडेमध्ये 99 तर टी-20 मध्ये 54 विकेट्स घेतल्या आहेत.