IND vs AUS 2020-21: भारताच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यात होणार मोठा बदल; पर्थऐवजी अ‍ॅडलेड किंवा ब्रिस्बेनमध्ये दौरा सुरू होण्याची शक्यता, 'हे' आहे कारण

भारताच्या ऑस्ट्रेलिया दौर्‍यामध्ये काही बदल होणे अपेक्षित आहे, कारण पश्चिम ऑस्ट्रेलिया (WA) सरकारने क्वारंटाइनचे नियम शिथिल न करण्याचा निर्णय घेतला आहे. अशा परिस्थितीत भारताच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्याची सुरुवात अ‍ॅडलेड किंवा ब्रिस्बेनमधील मालिकेने होऊ शकते. यापूर्वी पर्थ येथे संघाचे प्रशिक्षण सुरू करण्याची चर्चा होती, परंतु कोरोनाचे नियम तोडू नयेत म्हणून सरकारने निर्णय घेतला आहे.

टिम पेन आणि विराट कोहली (Photo Credit: Getty)

इंडियन प्रीमिअर लीगच्या 2020 हंगामानंतर टीम इंडिया (Team India) त्वरित ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर रवाना होईल. यूएई कडून भारतीय खेळाडूंनी ऑस्ट्रेलियाकडे (India Tour of Australia) रवाना होतील, जिथे दोन्ही देशांमध्ये टेस्ट, वनडे आणि टी-20 मालिका खेळली जाणे अपेक्षित आहे. यंदा ऑक्टोबर महिन्यात टी-20 मालिका खेळली जाणार होती, मात्र आयपीएल आणि टी-20 वर्ल्ड कपमुळे ते पुढे ढकलण्यात आले. दुसरीकडे, भारताच्या ऑस्ट्रेलिया दौर्‍यामध्ये काही बदल होणे अपेक्षित आहे, कारण पश्चिम ऑस्ट्रेलिया (Western Australia) सरकारने क्वारंटाइनचे नियम शिथिल न करण्याचा निर्णय घेतला आहे. अशा परिस्थितीत भारताच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्याची सुरुवात अ‍ॅडलेड (Adelaide) किंवा ब्रिस्बेनमधील (Brisbane) मालिकेने होऊ शकते. यापूर्वी पर्थ (Perth) येथे संघाचे प्रशिक्षण सुरू करण्याची चर्चा होती, परंतु कोरोनाचे नियम तोडू नयेत म्हणून सरकारने निर्णय घेतला आहे. (IND vs AUS 2020: टीम इंडियाविरुद्ध 'बॉक्सिंग डे' टेस्ट मेलबर्नच्या MCG बाहेर स्थानांतरित होण्याची शक्यता, ऑस्ट्रेलियाचा कर्णधार टिम पेन याने व्यक्त केली चिंता)

ESPNCricinfoच्या वृत्तानुसार, व्हिक्टोरिया राज्यात कोरोना व्हायरस प्रकरणात वाढ होत असल्याने मेलबर्न क्रिकेट मैदान (Melbourne Cricket Ground) उपलब्ध नसल्यास बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी (Border-Gavaskar Trophy) दरम्यान डे-नाईट सामना तसेच नंतर बॉक्सिंग डे मॅचसह सलग दोन सामने आयोजित करण्यासाठी अ‍ॅडिलेड ओव्हल (Adelaide Oval) मैदान सज्ज आहे. “परदेशातील उच्च धोका पत्करून संघ परत येईल असे आम्हाला वाटले नाही आणि नंतर क्वारंटाइनमध्ये प्रशिक्षण करेल व त्यानंतर सामने खेळण्यासाठी दुसर्‍या राज्यात जाईल. क्रिकेट ऑस्ट्रेलियाने सादर केलेल्या मॉडेलमध्ये बरीच जोखीम होती. आम्हाला जागरुक राहण्याची आणि सर्व पश्चिम ऑस्ट्रेलियन लोकांनी योग्य ते करण्याची आणि अनावश्यक जोखीम घेण्याची गरज नाही," अहवालात WA राज्य सरकारचे प्रीमियर मार्क मॅकगोव्हनचे म्हणणे मांडण्यात आले.

बायो-बबलच्या आत क्वारंटाइन कालावधीत आपल्या खेळाडूंना प्रशिक्षण द्यावे अशी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) क्रिकेट ऑस्ट्रेलियाला (सीए) विनंती केली आहे, परंतु पर्थमध्ये ते शक्य होणार नाही. क्रिकेट ऑस्ट्रेलिया प्रवक्त्याने सांगितले की, "आम्ही कबूल करतो की डब्ल्यूए सरकारचे क्वारंटाइन आणि सीमा व्यवस्थेबाबत ठाम मत आहे. ऑस्ट्रेलिया संघाला ब्रिटनहून परतल्यावर पर्थ येथे क्वारंटाइन केले जाणार नाही.” ऑस्ट्रेलिया सध्या मर्यादित षटकांच्या मालिकेसाठी इंग्लंडमध्ये असून यामध्ये तीन टी-20 आणि तितकेच वनडे सामने खेळतील.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now