India Women U19 vs Malaysia Women U19 Scorecard: भारताचा सलग दुसरा विजय; अवघ्या 2.5 षटकांत गाठले मलेशियाचे 32 धावांचे लक्ष

दुबळ्या मलेशिया संघासमोर मजबूत भारतीय संघाचे मोठे आव्हान होते. पण अपेक्षेप्रमाणे भारतासमोर मलेशिया संघाचा पराभव झाला. भारतीय संघाचे 2.5 षटकांत मलेशियाचे 32 धावांचे लक्ष गाठले.

Photo Credit-X

ICC Under 19 Womens T20 World Cup 2025 India Women U19 vs Malaysia Women U19 Live Streaming: भारत महिला अंडर-19 आणि मलेशिया महिला अंडर-19 संघातील (India Women U19 vs Malaysia Women U19) आजचा विश्वचषकाचा सामना क्वालालंपूरमधील बायुमास ओव्हल येथे पार पडला. गट अ मध्ये दुसऱ्या सामन्यात दोन्ही संघ आमनेसामने होते. भारताने मागील सामन्यामध्ये उत्कृष्ट गोलंदाजीच्या जोरावर वेस्ट इंडिजवर सहज विजय मिळवला होता. याही सामन्यात भारतीय महिला संघाने मलेशियाला पराभूत केले. भारताच्या पहिल्या सामन्यात विंडीजचा संघ फक्त 44 धावांत गुंडाळला. या सामन्यात भरतीय संघाने 2.5 षटकांत मलेशियाचे 32 धावांचे लक्ष गाठले.

मलेशिया संघात सर्वाधीक धावा नूर आलिया हैरुन आणि हुस्ना हीने केल्या दोघींनी केल्या. त्यांनी सर्वाधीक 5-5 धावा केल्या. त्यानंतर सुआबिका मनिव्हानान, नूर ऐन बिंती रोसलान यांनी प्रत्येकी 3-3 धावा केल्या. नूरिमन हिदाया हिने 2 तर, मार्सिया किस्तिना अब्दुल्ला आणि नूर डानिया स्याहुदा यांनी प्रत्येकी एक धावा केल्या. भारतीय संघाच्या आक्रमक गोलंदाजीर मलेशीयाच्या फलंदाजांचा निभाव लागला नाही.

दुसरीकडे, भारतीय संघातने मलेशियाचे 32 धावांचे लक्ष एकही विकेट न गमावता. अवघ्या ३ षटकांत पार केले. भारातकडून ओपनिंगला आलेल्या गोंगाडी त्रिशा, जी कमलिनी यांनी मलेशियाचे आव्हान सहज पार केले. गोंगाडी त्रिशा हिने 15 धावा, तर जी कमलिनी हिने 16 धावा केल्या.

दरम्यान, मलेशियाने त्यांचा पहिला सामना श्रीलंकेविरुद्ध 139 धावांनी गमावला. 163 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना मलेशियन संघ फक्त 23 धावांवर सर्वबाद झाला आणि त्यांना मोठा पराभव पत्करावा लागला. भारतीय संघ आपली विजयी मालिका कायम ठेवण्याचा प्रयत्न करेल तर मलेशिया डाव सुधारण्याचा प्रयत्न करेल.

दोन्ही संघाचे खेळाडू:

मलेशिया महिला अंडर-19 संघ: नूर आलिया हैरुन (विकेटकीपर), इर्दिना बेह नाबिल, नझातुल हिदाया रझाली, नूर इज्जातुल स्याफिका, सुआबिका मनिव्हानान, नूर डानिया स्याहुदा (कर्णधार), नूरिमन हिदाया, नूर ऐन बिंती रोसलान, नूर इस्मा डानिया, सिती नझवाह, मार्सिया किस्तिना अब्दुल्ला, फतीन फकीहा अदानी, नेसरले येन अलिक, नुनी फारिनी सफ्री, नूर आल्या नोर्मिझान

भारत महिला अंडर-19 संघ: गोंगाडी त्रिशा, जी कमलिनी (विकेटकीपर), सानिका चालके, निकी प्रसाद (कर्णधार), भाविका अहिरे, मिथिला विनोद, आयुषी शुक्ला, जोशिता व्ही जे, पारुनिका सिसोदिया, शबनम एमडी शकील, सोनम यादव, वैष्णवी शर्मा, दृथी केसरी. , आनंदिता किशोर

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement