IPL Auction 2025 Live

India vs South Africa T20 Series: भारताचा युवा खेळाडू संघ जाणार दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर; सुर्या पुन्हा करणार नेतृत्व

जी नोव्हेंबरमध्ये होणार आहे. या मालिकेतील पहिला सामना 8 नोव्हेंबर रोजी डर्बन येथे खेळवला जाणार आहे.

SuryaKumar Yadav (Photo Credit - X)

India vs South Africa T20 Series :   टीम इंडिया सध्या न्यूझीलंडसोबत कसोटी मालिका खेळत आहे. एक सामना झाला असून दोन सामने बाकी आहेत. मालिकेतील शेवटचा सामना मुंबईत 1 ते 5 नोव्हेंबर दरम्यान होणार आहे. यानंतर लवकरच संघाला दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर जायचे आहे. जिथे त्याला टी-20 मालिका खेळायची आहे. ही मालिका पाच सामन्यांची असेल. भारत या मालिकेसाठी आपला युवा संघ पाठवणार आहे. या मालिकेसाठी रोहित शर्मा आणि विराट कोहली यांना विश्रांती देण्यात आली आहे. यावेळी संघाचे नेतृत्व हे सुर्यकुमार यादव करणार आहे तर रविंद्र जाडेजा उपकर्णधार असणार आहे. (हेही वाचा  - Mushfiqur Rahim Milestone: दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या कसोटीत मुशफिकुर रहीमने रचला इतिहास, ही खास कामगिरी करणारा पहिला बांगलादेशी फलंदाज ठरला)

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात चार टी-20 सामन्यांची मालिका खेळवली जाणार आहे. जी नोव्हेंबरमध्ये होणार आहे. या मालिकेतील पहिला सामना 8 नोव्हेंबर रोजी डर्बन येथे खेळवला जाणार आहे. मालिकेतील दुसरा सामना 10 तारखेला आहे. तिसरा सामना 13 नोव्हेंबरला आणि चौथा सामना 15 नोव्हेंबरला होणार आहे.  सध्या जे खेळाडू न्यूझीलंडविरुद्ध कसोटी मालिका खेळत आहेत ते या मालिकेत खेळणार नाहीत, जो संघ नुकताच सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली बांगलादेशविरुद्ध टी-20 मालिकेत खेळला होता, तोच संघ पुढील मालिकेतही पाहायला मिळेल.

सध्या कोणतीही मोठी टी-20 स्पर्धा होणार नसली तरी आतापासून तयारी सुरूच राहणार आहे. जेणेकरून संघ तयार करता येईल. कोणता खेळाडू कसा कामगिरी करतो, पुढील संघ निवडणे सोपे होईल.