SA 133 in 48 Overs | IND vs SA 3rd Test Day 4 Live Score Updates: टीम इंडियाने आफ्रिकेवर एक डाव आणि 202 धावांनी मिळवला विजय

भारत आणि दक्षिण आफ्रिका संघात आज तिसऱ्या टेस्टच्या चौथ्या दिवशीचा खेळ रांचीच्या जेएससीए स्टेडियममध्ये खेळला जाईल. आफ्रिका संघ अद्याप भारताच्या पहिल्या डावातील धावांच्या तुलनेत 203 धावा मागे आहे, तर टीम इंडिया मालिका क्लीन-स्वीप करण्यासाठी 2 विकेट दूर आहे.

22 Oct, 15:16 (IST)

रांचीच्या जेएससीए स्टेडियममध्ये भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यात खेळल्या गेलेल्या तिसर्‍या कसोटी सामन्यात टीम इंडियाने पाहुण्या संघाचा एक डाव आणि 202 धावांनी पराभव केला आणि आणि मालिका 3-0 ने जिंकत आफ्रिकेवर क्लीन-स्वीप मिळवला. भारताने पहिल्यांदा टेस्टमध्ये आफ्रिकाविरुद्ध क्लीन-स्वीप केलं आहे. 


भारत (India) आणि दक्षिण आफ्रिका (South Africa) संघात आज तिसऱ्या टेस्टच्या चौथ्या दिवशीचा खेळ रांचीच्या जेएससीए स्टेडियममध्ये खेळला जाईल. तिसऱ्या दिवशी भारताने दक्षिण आफ्रिकेला पहिल्या डावांत 162 धावांवर ऑल आऊट केल्यावर कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) यांनी फॉलोऑन देण्याचा निर्णय घेतला. त्याच्यानंतर दक्षिण आफ्रिदीची स्थती जशाच तशी होती. तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा आफ्रिकेने 132 धावांवर 8 विकेट गमावले. आफ्रिकेवर दबाव बनवून ठेवण्यासाठी भारतीय वेगवान गोलंदाज- मोहम्मद शमी, उमेश यादव यांनी महत्वाची भूमिका बजावली. आफ्रिका संघ अद्याप भारताच्या पहिल्या डावातील धावांच्या तुलनेत 203 धावा मागे आहे, तर टीम इंडिया मालिका क्लीन-स्वीप करण्यासाठी 2 विकेट दूर आहे. तिसऱ्या दिवसाखेर थेयुनिस डी ब्रूयन आणि एनरिच नॉर्टजे, नाबाद अनुक्रमे 30 आणि 5 धावांवर खेळत होते.

सलामी फलंदाज डीन एल्गर 16 धावांवर जखमी झाल्यानंतर तो मैदानात उतरला नाही आणि कनकशन म्हणूनडी ब्रूयन फलंदाजीसाठी आला. दरम्यान, दक्षिण आफ्रिकाविरुद्ध क्लीन-स्वीप मिळवत भारत एक ऐतिहासिक विजय मिळवेल. यापूर्वी भारताने आफ्रिकेवर कधीही क्लीन-स्वीप मिळवला नव्हता. 497 धावा करुन भारताने पहिला डाव घोषित केला. विशाखापट्टणम आणि पुणेमध्ये पहिल्या दोन कसोटी जिंकल्यानंतर भारतीय संघाने या मालिकेत 2-0 अशी आघाडी मिळवली आहे. फॉलोऑन खेळणाऱ्या आफ्रिका संघाची तिसऱ्या दिवशी सुरुवात चांगली झाली नाही. सलामी फलंदाज क्विंटन डी कॉक मालिकेत सलग दुसऱ्यांदा अपयशी राहिला. त्याला दुसऱ्या डावात शमीच्या गोलंदाचीवर उमेश यादव याने धाव बाद केले. त्याच्यानंतर झुबैर हमझा, फाफ डू प्लेसिस आणि टेंबा बावुमा यांना बाद करत आफ्रिकेची मधली फळी उध्वस्त केली.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement