India Vs New Zealand: न्युझीलंड विरुध्द भारत सामान्याबाबत टीम न्यूझीलंडचा मोठा निर्णय, ‘या’ स्टार खेळाडू ऐवजी नव्या खेळाडूला संधी

भारता विरुध्द होणाऱ्या सामन्यांमध्ये फिन ऍलनला संधी देण्यात आली आहे.

न्यूझीलंड क्रिकेट टीम (Photo Credit: PTI)

आयसीसी टी२० वर्लडकपमध्ये (ICC T20 World Cup) सर्वोत्तम कामगिरी केलेले दोन संघ म्हणजे भारत (India) आणि न्यूझिलंड (New Zealand). संपूर्ण वर्ल्डकप दरम्यान भारत आणि न्यूजिलंड या दोन संघाने केवळ एक-एक सामने हरले आणि थेट सेमी फायनल्समध्ये (Semi Finals) एण्ट्री मिळवली. पण या दोन्ही संघाचं गणित गंडलं ते सेमी फायनल्समध्येचं. भारताचा इंग्लंडने (England) तर न्यूझिलंडचा पाकिस्तानने ( पराभव करत थेट  टी२० वर्लडकपच्या फायनल्समध्ये एण्ट्री मिळवली. तर सपूर्ण वर्लडकप दरम्यान उत्तम प्रदर्शन करणाऱ्या या दोन्ही संघांना नाराशेने आपापल्या मायदेशी परतावं लागलं. पण या दोन्ही संघांचं नेमक काय चुकलं हेच कदाचित क्रॉस चेक करणारा भारत विरुध्द न्यूझिलंड टूर्नामेंट होणार आहे. तरी या टूर्नामेंटमधून दोन्ही संघांना आपली पात्रतेचा पुरावा देण्याची एक सुवर्ण संधी मिळणार आहे.

 

तरी या टुर्नामेंटसंबंधी टीम न्यूझिलंडने एक मोठा निर्णय घेतला आहे. भारता विरुध्द होणाऱ्या सामन्यांमध्ये फिन ऍलनला संधी देण्यात आली आहे. 23 वर्षीय एलनला संधी देणं म्हणजे न्यूझीलंड संघ यावेळी अनुभवी खेळाडूंपेक्षा तरुण खेळाडूंना संधी देण्यात कल दिसून येत आहे. फिन एलनने यापूर्वीच 23 T20 सामने आणि आठ एकदिवसीय सामने खेळले आहेत, ज्यात त्याने पाच अर्धशतके तर 1 शतके ठोकलं आहे. तर न्यूझिलंडच्या मार्टिन गुप्टील ऐवजी फिन एलनला या टूर्नामेंटमध्ये धी देण्यात आली आहे. तरी वर्षभरावर येवून ठेपलेल्या आयसीसी वर्लकपसाठी न्यूझिलंड आपली सेना बळकट करताना दिसत आहे.

 

भारत विरुध्द न्यूझिलंड टूर्नामेटमध्ये केन विल्यमसन कर्नधर पदाची धुरा सांभाळतील. फिन ऍलन, मायकेल ब्रेसवेल,डेव्हॉन कॉनवे, लॉकी फर्ग्युसन, मॅट हेन्री, टॉम लॅथम, डॅरिल मिशेल, अॅडम मिलने,जिमी नीशम*, ग्लेन फिलिप्स, मिचेल सँटनर, ईश सोधी, टिम साउथी, ब्लेअर टिकनर हे खेळाडू असणार आहे. तरी या सामन्यांसाठी अजूनतरी भारतीय संघांकडून कुठलीही घोषणा करण्यात आलेली नाही.