India Vs New Zealand 3rd ODI: भारतापुढे 244 धावांचे लक्ष्य; तिसरा सामना जिंकून मालिका विजयाची संधी

न्युझीलंडविरुद्ध माऊंट मॉनगनुई के बे ओव्हल मैदानवर सुरु असलेल्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारतापुढे 244 धावांचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे.

Indian Cricket Team (Photo Credit: IANS)

India Vs New Zealand 3rd ODI: न्युझीलंडविरुद्ध माऊंट मॉनगनुई येथील बे ओव्हल (Bay Oval) मैदानावर सुरु असलेल्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारतापुढे 244 धावांचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे.

न्युझीलंडने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. मात्र न्युझीलंडचे सलामीवीर मार्टिन गुप्टील आणि कोलिन मुनरो हे अनुक्रमे 13 आणि 7 धावांत माघारी परतले. अडखळत सुरुवात झालेल्या न्युझीलंडचा डाव रॉस टेलरच्या दमदार खेळाने सावरला. 93 धावांची खेळी करत टेलर तंबूत परतला. 93 धावांच्या खेळीत त्याने 9 चौकार लगावले. टेलर शिवाय विकेटकीपर टॉम लाथमने अर्धशतकी खेळी केली. तर कर्णधार विलियम्सने 28 धावांचे योगदान दिले. 243 धावांत न्युझीलंडचा खेळ आटोपला. (कुलदीप यादव आणि युजवेंद्र चहल यांच्या फिरकीची कमाल; 100 विकेट्सचा विक्रम)

या सामन्यात मोहम्मद शमीला तीन विकेट्स घेण्यात यश आले. तर युजवेंद्र चहल, हार्दिक पांड्या आणि भुवनेश्वर कुमार यांनी प्रत्येकी 2-2 विकेट् घेतल्या.

पाच सामन्यांच्या मालिकेत भारताने 2-0 अशी आघाडी घेतली असून तिसरा सामना जिंकल्यास भारताला मालिका विजयाची संधी मिळेल.