India vs New Zealand, 2nd ODI: न्यूझीलंडला धक्का देत टीम इंडिया 90 धावांनी विजयी, मालिकेत 2-0 ची आघाडी; प्रजासत्ताक दिनाच्या मोक्यावर 'विराट' भेट
नाणेफेक जिंकत भारताना पहिल्यांदा फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि निर्धारीत 50 षटकांमध्ये 4 गडी गमावत 324 धावा केल्या. उत्तरादाखल मैदानात फलंदाजीस उतरलेला न्यूझीलंड संघ (Zealand Team) 41 धावांमध्ये सर्व गडी बाद 234 धावांमध्येच गारद झाला.
India vs New Zealand, 2nd ODI: भारतीय क्रिकेट संघाने (Team India) शनिवारी माऊंट मॉनगनुई (Mount Maunganui) येथे दुसरा एकदिवसीय सामना (2nd ODI) जिंकत देशवासियांना प्रजासत्ताक दिनाची (Republic Day) भेट दिली. भारीतय संघाने न्यूझीलंडवर 90 धावांनी पराभूत करत मालिकेत 2-0 अशी आघाडी घेतली. या मालिकेतील तिसरा सामना माऊंट मॉनगनुई येथे सोमवारी( 28 जानेवारी) खेळला जाणार आहे. नाणेफेक जिंकत भारताना पहिल्यांदा फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि निर्धारीत 50 षटकांमध्ये 4 गडी गमावत 324 धावा केल्या. उत्तरादाखल मैदानात फलंदाजीस उतरलेला न्यूझीलंड संघ (Zealand Team) 41 धावांमध्ये सर्व गडी बाद 234 धावांमध्येच गारद झाला. आजच्या सामन्यात कुलदीप यादव (Kuldeep Yadav) याची गोलंदाजी विशेष कामगिरी करताना पाहायला मिळाली. एकट्या कुलदीप यादवने उत्कृष्ट गोलंदाजीचे प्रदर्शन करत चार गडी बाद केले.
भारताने ठेवलेल्या आव्हानाचा पाटलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या न्यूझीलंड संघाची लय बिघडवण्यात कुलदीप यादव यशस्वी ठरला. त्याने मार्टिन गप्लिट याला अवघ्या 15 धावांमध्ये चहलच्या हातात झेल देऊन बाद केले. त्यानंतर शमीने विल्यमसन याला 20 धावांवरच क्लिन बोल्ड केले. या दोन हिट विकेट पडल्यानंतर न्यूझीलंड संघात अस्वस्थता पसरली. जी न्यूझीलंडला पुढे पराभवाच्या गर्तेत घेऊन गेली. युजवेंद्र चहल याने मैदानावर बऱ्यापैकी जम बसवलेल्या सलामीविर कॉलिन मुनरो याला 31 धावांमध्ये पायचित केले. न्यूझीलंड संघाला बसलेला हा तिसरा धक्का होता. त्यानंतर लवकरच केदार जाधवच्या चेंडूवर धोनीने स्टंपींगचा जबरदस्त अविष्कार दाखवत रॉस टेलरला 22 धावांमध्येच तंबूत धाडले.
कुलदीप यादव याने टॉम लॅथम याला 34 आणि कॉलिन डी ग्रॅंडहोम याला अवघ्या 3 धावांवरच शिकार बनवले. या विकेटमुळे सामना फिरला आणि भारताचे पारडे जड झाले. त्यानंतर कुलदीपने अल्पावधीतच हेनरी निकोल्स याला 28 धावांवर गारद केले. दरम्यान, त्यापूर्वी रोहित शर्मा आणि शिखर धवन यांनी धमाकेदार खेळी करत टीम इंडियाला शनिवारी दुसऱ्या वन-डे मध्ये न्यूझीलंडसमोर 325 धावांचे लक्ष्य ठेवले. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीसाठी मैदानात उतरलेल्या भारतीय संघाने निर्धारीत 50 षटकांमध्ये 4 गडी बाद 324 धावा केल्या. एमएस धोनी 48 आणि केदार जाधव 22 धावांवर नाबाद राहिले. (हेही वाचा, हार्दिक पांड्या आणि केएल राहुल यांना दिलासा; BCCI ने रद्द केले निलंबन)
दरम्यान, भारतीय संघाकडून शिखर धवन याने 66 आणि रोहित शर्मा याने 87 धावा काढत भारतीय संघाला मजबूत स्थितीत आणून ठेवले. रोहित शर्माने 62 धावा 6 चौचार 2 षटकारांच्या रुपात त्याच्या एकदिवसीय सामन्यांतील 38 वे शतक ठोकले. शिखर धवन यानेही आपल्या वन-डे करिअरमधील 27वे अर्धशतक झळकावले. रोहित शर्मा मात्र 96 धावांवर बाद झाल्याने त्याचे शतक हुकले. कप्तान विराट कोहली आणि अंबादती रायडू यांनी वेगवान 64 धावांची खेळी केली. ज्यामुळे भारतीय संघ अल्पावधीतच 200 धावांवर पोहोचला. रायडूने 47 धावा केल्या.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)