India Squad for South Africa Tour: निवड समितीच्या बैठकीत 3 मोठे निर्णय अपेक्षित, ‘या’ खेळाडूंच्या भविष्यावर निर्णयाची शक्यता
दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी भारतीय संघाची घोषणा करणे अपेक्षित आहे. चेतन शर्मा यांच्या नेतृत्वात निवड समिती संघनिवडीच्या बैठकीत काही मोठे निर्णय घेतले जाण्याची अपेक्षा आहे जे खालीलप्रमाणे आहेत.
Covid-19 च्या Omicron या नव्या व्हेरियंटच्या वाढत्या धोक्यामुळे भारताचा दक्षिण आफ्रिका दौरा (India Tour of South Africa) काही दिवसांनी स्थगित करण्यात आला आहे, परंतु त्यामुळे बीसीसीआयची (BCCI) निवड समितीची डोकेदुखी कमी झालेली नाही. आयसीसी टी-20 विश्वचषक 2021 च्या आधी काही शंकास्पद निर्णय घेतल्यापासून निवडकर्ते (Selectors) रडारवर आले आहेत आणि आता दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी संघ निवडीपूर्वी ते पुन्हा चर्चेत आहेत. 50 षटकांच्या फॉरमॅटमध्ये सध्याचा भारताचा कसोटी आणि वनडे कर्णधार विराट कोहलीचा (Virat Kohli) कर्णधारपद असो किंवा खेळाच्या सर्वात लांब फॉरमॅटमध्ये अजिंक्य रहाणेचे (Ajinkya Rahane) उपकर्णधारपद कायम राहावे असे काही मोठे निर्णय घेतले जाण्याची शक्यता आहे. मुंबईत न्यूझीलंडविरुद्ध (New Zealand) दुसऱ्या कसोटीच्या समाप्तीनंतर निवडकर्त्यांनी दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी भारतीय संघाची (Indian Team) घोषणा करणे अपेक्षित आहे. चेतन शर्मा यांच्या नेतृत्वात निवड समिती संघनिवडीच्या बैठकीत काही मोठे निर्णय घेतले जाण्याची अपेक्षा आहे जे खालीलप्रमाणे आहेत. (India Tour of South Africa 2021: भारताचा दक्षिण आफ्रिका दौरा 9 दिवसांनी स्थगित, 26 डिसेंबरपासून बॉक्सिंग डे कसोटीसह होणार ‘शुभारंभ’)
विराट कोहली वनडे कर्णधारपदी कायम राहणार?
कोहली भारताच्या टी-20 कर्णधारपदावरून पायउतार झाल्यापासून, त्याच्या जागी रोहित शर्माला वनडे कर्णधार म्हणून नियुक्त केले जाणार असल्याच्या चर्चाही जोरात सुरू आहेत. टी-20 आणि वनडे फॉरमॅटसाठी संघांचे वेगवेगळे कर्णधार असणे सामान्य गोष्ट नाही. रोहितने अधिकृतपणे त्याच्या जागी सर्वात लहान फॉरमॅटचे नेतृत्व केले असताना असेही काही लोक आहेत ज्यांचा असा विश्वास आहे की हा बदल लवकरच एकदिवसीय फॉरमॅटमध्ये देखील होऊ शकतो. भारताच्या दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यात देखील वनडे सामन्यांचा समावेश आहे आणि निवड समिती या विषयावर चर्चा करणे अपेक्षित आहे.
अजिंक्य रहाणेऐवजी रोहित शर्मा कसोटी उपकर्णधार?
हॅमस्ट्रिंगच्या दुखापतीमुळे रहाणे मुंबई कसोटीत प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळू शकला नाही, परंतु कानपूर कसोटीत श्रेयस अय्यर ज्या पद्धतीने खेळला त्यावरून अनेकांनी या बदलाचा अंदाज वर्तवला होता. रोहित शर्मा आणि केएल राहुल यांनाही दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी टीम इंडियाच्या कसोटी संघात स्थान मिळणे अपेक्षित आहे. त्यामुळे रहाणेचे प्लेइंग इलेव्हनमधील स्थान गंभीर अडचणीत येऊ शकते. रहाणेला प्लेइंग इलेव्हनमध्ये मुख्य आधार असण्याची अपेक्षा नसल्यामुळे, नवीन कसोटी उपकर्णधाराची नियुक्ती केली जाण्याची शक्यता आहे आणि रोहित यंदा प्रबळ दावेदार आहे.
इशांत शर्माला निरोप देण्याची वेळ?
गेल्या काही वर्षांत, इशांत भारताच्या कसोटी संघाचा सर्वोत्तम वेगवान गोलंदाज आहे. तथापि, मोहम्मद सिराजच्या झपाट्याने उदयाने संघ व्यवस्थापनाची डोकेदुखी नक्कीच वाढली असेल.मोहम्मद शमी आणि जसप्रीत बुमराह देखील दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी संघात पुनरागमन करण्याची अपेक्षा असल्यामुळे आणि न्यूझीलंड मालिकेसाठी विश्रांती मिळालेली इशांतच्या संघातील स्थानावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. प्रसिध कृष्णा आणि आवेश खान हे इतर काही गोलंदाज आहेत संघातील जागेच्या प्रतीक्षेत आहेत तर शार्दुल ठाकूरचे अष्टपैलू कौशल्य देखील त्याला फायदेशीर दावेदार बनवतात. अशा वेळी भारताच्या रेड-बॉल संघातही इशांतच्या भवितव्याबाबत निवडकर्त्यांनी चर्चा करणे अपेक्षित आहे.