India Tour Of Australia 2020-21: रोहित शर्माच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्याबाबत मोठी माहिती, BCCI मेडिकल टीम रविवारी करणार ओपनरच्या फिटनेसचे मूल्यांकन
भारतीय क्रिकेट बोर्डाने रोहित शर्माच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्याबाबत महत्त्वाची माहिती दिली आणि 'हिटमॅन' अद्यापही भारताच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यातून बाहेर पडला नसल्याने बीसीसीआयने नुकतंच स्पष्ट केलं. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) कार्यकारिणीने 33 वर्षीय रोहितबद्दल सांगितले की रविवारी मेडिकल टीम अनुभवी फलंदाजाच्या फिटनेसचे मूल्यांकन करण्यासाठी तयार आहे.
India Tour Of Australia 2020-21: टीम इंडियाच्या (Team India) आगामी ऑस्ट्रेलिया (Australia) दौऱ्यासाठी रोहित शर्माला (Rohit Sharma) संघात स्थान न मिळाल्यामुळे निवड समितीच्या भूमिकेवर सतत प्रश्नचिन्ह उभे केले जात आहे. इंडियन प्रीमियर लीग (Indian Premier League) 2020 मधील उर्वरित सामन्यांतून तो बाहेर पडला नसला तरी ऑस्ट्रेलिया दौर्यासाठी भारताच्या संघात (India Tour of Australia Squad) रोहितच्या हॅमस्ट्रिंग दुखापतीचे (Rohit Sharma Hamstring Injury) कारण सांगून निवड झालेल्या तीन फॉर्मेट संघाबाहेर रोखले आहे. पण शनिवारी भारतीय क्रिकेट बोर्डाने रोहितच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्याबाबत महत्त्वाची माहिती दिली आणि 'हिटमॅन' अद्यापही भारताच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यातून बाहेर पडला नसल्याने बीसीसीआयने नुकतंच स्पष्ट केलं. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) कार्यकारिणीने 33 वर्षीय रोहितबद्दल सांगितले की रविवारी मेडिकल टीम अनुभवी फलंदाजाच्या फिटनेसचे मूल्यांकन करण्यासाठी तयार आहे. वृत्तसंस्था ANIच्या वृत्तानुसार, रोहित तंदुरुस्त आहे की त्याला अजून विश्रांतीची गरज आहे की नाही याबद्दल वैद्यकीय पथक निर्णय घेईल. बीसीसीआयशी (BCCI) संबंधित सूत्रांनी सांगितले की, “उद्या (रविवारी) रोहितच्या दुखापतीचे मूल्यांकन केले जाईल आणि तेथे (ऑस्ट्रेलिया) जाणे योग्य आहे की नाही याबाबत निर्णय घेतला जाईल.” (Scott Styris on Suryakumar Yadav: भारतीय संघात स्थान न मिळालेल्या सूर्यकुमार यादवला न्यूझीलंडच्या स्कॉट स्टायरिसची ऑफर)
त्याने पुढे म्हटले की, “हे हॅमस्ट्रिंग दुखापतीचे प्रकरण आहे, ज्यामध्ये वास्तविक आव्हान आहे की त्यांना वेगात धावणे आणि वळण लावण्यात अडचणींचा सामना करावा लागतो. तो पूर्णपणे बरा झाला आहे की त्याला अधिक काळाची गरज आहे हे वैद्यकीय पथक पाहेल.” प्रवेग आणि घसरण टेस्टच्या सूक्ष्मतेचे स्पष्टीकरण देण्यास विचारले असता ते म्हणाले, “रोहितच्या स्नायूंची दुखापत दुसऱ्या श्रेणीची आहे. अशा स्थितीत फलंदाजाला चालणं आणि नियमित फलंदाजी करणं शक्य असतं, पण खेळपट्टीवर धावणं आणि फिल्डिंग करताना धावणं या गोष्टींवर बंधनं येतात. सहसा एकेरी धाव घेऊन पटकन दुसऱ्या धावेसाठी वळताना स्नायूंवर ताण येतो आणि अशाप्रकारची दुखापत होते. जर तुम्ही दुखापतीतून पूर्ण सावरले असाल तर तुम्हाला धावण्यात समस्या उद्भवणार नाही.”
दरम्यान, भारतीय संघ 12 नोव्हेंबरला ऑस्ट्रेलिया पोहचेल आणि जर त्याच्या दुखापतीने येत्या काही दिवसांत सुधारण्याची चिन्ह दर्शविली तर रोहित सर्व महत्त्वपूर्ण मालिकेतून स्थान मिळवू शकेल. रोहितला हॅमस्ट्रिंगची दुखापत झाल्याचे सांगण्यात येत आहे, परंतु त्यातील व्याप्ती पूर्णपणे समजलेले नाही. युएईमधील मुंबई इंडियन्सच्या वैद्यकीय पथकाद्वारे त्याच्यावर उपचार सुरु आहे आणि नेट्समध्ये तो संघासह सराव करताना दिसला.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)