IND vs AUS 2020-21: टीम इंडियाच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर टी-20, वनडे मालिकेचे वेळापत्रक जाहीर; पाहा कधी आणि कुठे होणार सामने

भारताच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्याची सुरुवात टी-20 मालिकेने होईल. त्यानंतर चार सामन्यांची कसोटी आणि तीन सामन्यांची वनडे मालिका खेळली जाईल. भारतीय टीम कोरोना स्थिती सुधारल्यास यंदा डिसेंबर महिन्यात ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार आहे.

आरोन फिंच आणि विराट कोहली (Photo Credit: Getty)

भारतीय टीम (Indian Team) कोरोना स्थिती सुधारल्यास यंदा डिसेंबर महिन्यात ऑस्ट्रेलिया (Australia) दौऱ्यावर जाणार आहे. क्रिकेट ऑस्ट्रेलिया तसे शेड्युलही तयार केले आहे. आणि आता ऑस्ट्रेलिया बोर्ड (Cricket Australia) 2020-21 च्या मोसमातील वेळापत्रक निश्चित करणारे पहिले बोर्ड ठरले. कोरोनामुळे यंदाच्या सर्व क्रीडा स्पर्धांवर परिणाम झाले. ऑस्ट्रेलियाच्या 2020-21 च्या मोसमात भारत आणि अफगाणिस्तानविरुद्ध कसोटी सामन्यांसह भारत, न्यूझीलंड आणि झिम्बाब्वे विरुद्ध टी-20 आणि भारत, न्यूझीलंड आणि वेस्ट इंडीज विरुद्ध वनडे सामन्यांचा समावेश आहे. भारताच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्याची सुरुवात टी-20 मालिकेने होईल. त्यानंतर चार सामन्यांची कसोटी (Test) आणि तीन सामन्यांची वनडे (ODI) मालिका खेळली जाईल. या दौऱ्यावर टीम इंडिया पहिल्यांदा विदेशी मातीवर डे-नाईट कसोटी मालिकाही खेळणार आहे. हा सामना अ‍ॅडिलेडच्या मैदानावर खेळला जाईल. (IND vs AUS 2020: भारत-ऑस्ट्रेलिया कसोटी मालिकेचे वेळापत्रक जाहीर; अ‍ॅडिलेड मैदानावर खेळला जाणार एकमेव डे-नाईट टेस्ट)

टी-20 वर्ल्ड कप आधी दोन्ही टीममध्ये टी-20 मालिका खेळली जाईल. 11, 14 आणि 17 ऑक्टोबर रोजी गब्बा, मानुका ओव्हल आणि अ‍ॅडिलेड ओव्हल येथे ऑस्ट्रेलिया-भारत दरम्यान टी-टी-20 मालिका खेळली जाईल. त्यांनतर डिसेंबरमध्ये कसोटी मालिकेला सुरुवात होईल. सिडनी येथे भारतीय कसोटी मोहिमेच्या समाप्तीनंतर पर्थ स्टेडियमवर 12 जानेवारी रोजी वनडे मालिकेच्या पहिल्या सामन्यात दोन्ही संघ आमने-सामने येतील. त्यानंतर मेलबर्न (15 जानेवारी) आणि सिडनीमध्ये (17 जानेवारी) दौऱ्याचा अखेरचा सामना रंगेल.

पाहा संपूर्ण वेळापत्रक: टी-20 मालिका

11 ऑक्टोबर: ब्रिस्बेन

14 ऑक्टोबर: कॅनबेरा

17 ऑक्टोबर: अ‍ॅडलेड ओव्हल

वनडे मालिका:

12 जानेवारी: पर्थ

15 जानेवारी: मेलबर्न

17 जानेवारी: सिडनी