India Tour of Australia 2020-21: टीम इंडिया ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी रवाना; विराट कोहली ची खास फोटोद्वारे माहिती
याची माहिती देणारा एक फोटो भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली याने ट्विटरवर शेअर केला आहे.
आयपीएल चा 13 (IPL 2020) वा सीजन काल (10 नोव्हेंबर) संपल्यानंतर भारतीय क्रिकेट संघ (Indian Cricket Team) आता ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी (Australia Tour) रवाना झाला आहे. याची माहिती देणारा एक फोटो भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) याने ट्विटरवर शेअर केला आहे, यात त्याने ऑस्ट्रेलियाच्या मार्गावर असल्याचे सांगितले. या फोटोत विराट कोहली सोबत दीपक चहर (Deepak Chahar) देखील दिसत आहे. दोघांनीही मास्क घातला असून दोघेही थमअप्स करताना दिसत आहेत.
हा खास फोटो शेअर करत विराट कोहलीने लिहिले, "En route Australia." खरंतर त्याने ऑस्ट्रेलिया असं न लिहिता देशाच्या झेंड्याचा ईमोजी वापरला आहे. (येथे पहा इंडियन क्रिकेट टीमच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्याचे संपूर्ण वेळापत्रक)
विराट कोहली ट्विट:
या ऑस्ट्रेलिया दौऱ्यात एकदिवसीय, कसोटी आणि टी-20 सामने रंगणार आहेत. 27 नोव्हेंबर ते 19 जानेवारीपर्यंत हा दौरा असणार आहे. यात 27 नोव्हेंबर ते 2 डिसेंबर पर्यंत एकदिवसीय सामने रंगणार आहेत. तर 4 ते 8 डिसेंबरमध्ये टी-20 सामने होतील, त्यानंतर 17 डिसेंबर ते 19 जानेवारी दरम्यान 4 टेस्ट मॅचेस होणार आहेत. दरम्यान, विराट कोहली पहिल्या कसोटी सामन्यानंतर भारतात परतणार आहे. अनुष्का शर्मा प्रेग्नेंट असून जानेवारी महिन्यात बाळाला जन्म देणार असल्याने विराटला भारतात परतावे लागणार आहे. (IND vs AUS 2020-21: स्टीव्ह वॉ यांचा ऑस्ट्रेलिया संघाला सल्ला; भारतीय संघाच्या 'या' फलंदाजाला 'स्लेज' करू नका, नाहीतर पडेल भारी!)
नुकत्याच बीसीसीआयने केलेल्या घोषणेनुसार, ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी टीम इंडियाच्या कसोटी संघामध्ये रोहीत शर्माला स्थान देण्यात आले आहे. तसेच वन डे संघात एक्सट्रा विकेटकिपर म्हणून संजू सॅमसन याला नियुक्त करण्यात आले आहे. वरुण चक्रवर्ती खांद्याच्या दुखापतीमुळे टी 20 संघात आपले स्थान टिकवू शकला नाही. त्यामुळे त्याच्या ऐवजी टी. नटराजन याला टी20 संघात स्थान देण्यात आले आहे. दरम्यान, इशांत शर्मा याने फिटनेस टेस्ट पास केल्यानंतर त्याला भारताच्या कसोटी संघात घेण्यात येईल.