IPL Auction 2025 Live

Arundhati Reddy : टीम इंडियाला मोठा धक्का! भारताची स्टार खेळाडू अरुंधती रेड्डीवर आयसीसीची मोठी कारवाई

या सामन्यात भारताने पाकिस्तानचा पराभव केला होता.

PC-X

Arundhati Reddy has been given 1 demerit point by ICC : महिला टी-20 विश्वचषक 2024 स्पर्धेचे (Womens T20 World Cup) आयोजन युएईमध्ये करण्यात आले आहे. या स्पर्धेत भारताची सुरुवात काही खास झालेली नाही. हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली खेळणारा भारतीय संघ विश्वचषक जिंकण्याच्या इच्छेने तिथे गेला आहे, पण त्यांची कामगिरी पाहता टीम इंडिया उपांत्य फेरीत पोहोचेल की नाही हे सांगणे कठीण झाले आहे. दरम्यान, आयसीसीनेही(ICC) एका खेळाडूला फटकारून भारतीय संघाला मोठा धक्का दिला आहे. टीम इंडियाची स्टार गोलंदाज अरुंधती रेड्डी(Arundhati Reddy) हिला आचारसंहितेचे उल्लंघन केल्याप्रकरणी आयसीसीने फटकारले आहे. (हेही वाचा: IND-W vs SL-W, Dubai Weather, Rain Forecast and Pitch Report: दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर भारत विरुद्ध श्रीलंका महिला टी 20 विश्वचषक 2024 च्या सामन्यात कसे असेल हवामान?)

अरुंधती रेड्डीवर कारवाई –

अरुंधती रेड्डीने पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात असे काही केले होते की, ज्यामुळे आयसीसीला हा निर्णय घ्यावा लागला? जाणून घेऊया. 6 ऑक्टोबर रोजी भारतीय महिला संघ आणि पाकिस्तान महिला संघ यांच्यात सामना झाला. या सामन्यात टीम इंडियाने पाकिस्तानचा 6 गडी राखून पराभव केला. या सामन्यात सामनावीर ठरलेल्या अरुंधती रेड्डीने तीन विकेट्स घेतल्या होत्या. मात्र, आता अरुंधती रेड्डीवर आयसीसीने मोठी कारवाई केली आहे.

काय आहे प्रकरण?

वास्तविक, पाकिस्तानच्या डावातील २०व्या षटकातील चौथ्या चेंडूवर तिने निदा दारला बाद केले होते. दार 34 चेंडूंचा सामना करत 28 धावा करून बाद झाला. तो बाद झाल्यानंतर अरुंधतीने आक्रमकपणे सेलिब्रेशन केले. तिने पाकिस्तानच्या पॅव्हेलियनकडे हातवारेही केले. हे आयसीसीच्या आचारसंहितेचे उल्लंघन करते. या कारणास्तव आयसीसीने अरुंधतीला 1 डिमेरिट पॉइंट दिला आहे. हा स्तर एकचा गुन्हा मानला जातो.

अरुंधती रेड्डीने आयसीसीच्या आचारसंहितेच्या कलम 2.5 चे उल्लंघन केल्याचे आढळून आले आहे. आंतरराष्ट्रीय सामन्यादरम्यान फलंदाज बाद झाल्यानंतर अपमानास्पद भाषा किंवा आक्रमक प्रतिक्रिया वापरली जाते, तेव्हा हे उल्लंघन मानले जाते. याशिवाय तिला एक डिमेरिट पॉइंटही देण्यात आला आहे. अरुंधती रेड्डीने आपली चूक मान्य केली आहे. त्याचबरोबर एमिरेट्स आयसीसी आंतरराष्ट्रीय सामना पंचांच्या शांद्रे फ्रिट्झने दिलेली शिक्षा स्वीकारली. टीम इंडियाला आपला पुढचा सामना श्रीलंके संघाविरुद्ध खेळायचा आहे. हा सामना 9 ऑक्टोबर रोजी दुबईत होणार आहे. दोन्ही संघांसाठी हा सामना अत्यंत महत्त्वाचा असणार आहे.