2022 वर्ल्ड कपनंतर भारतीय कर्णधार Mithali Raj ने दिले निवृत्तीचे संकेत, दोन दशकांहून अधिक काळ गाजवलं आंतरराष्ट्रीय मैदान

न्यूझीलंड येथे पुढील वर्षी आयोजित होणारी 2022 एकदिवसीय वर्ल्ड कप स्पर्धा आपली अखेरची असणार असल्याचे भारतीय महिला वनडे संघाची कर्णधार मिताली राजने संकेत दिले. दोन दशकांहून अधिक काळ क्रिकेटचं मैदान गाजवणाऱ्या 38 वर्षीय मितालीने असेही म्हटले की ती न्यूझीलंडच्या सजीव खेळपट्टीसाठी उत्तम वेगवान बॉलिंगचा पर्याय शोधत आहे.

2022 वर्ल्ड कपनंतर भारतीय कर्णधार Mithali Raj ने दिले निवृत्तीचे संकेत, दोन दशकांहून अधिक काळ गाजवलं आंतरराष्ट्रीय मैदान
भारतीय महिला क्रिकेटर मिताली राज (Photo Credit: Facebook)

Mithali Raj Hints at Intl Retirement: न्यूझीलंड येथे पुढील वर्षी आयोजित होणारी 2022 एकदिवसीय वर्ल्ड कप (2022 ODI World Cup) स्पर्धा आपली अखेरची असणार असल्याचे भारतीय महिला वनडे संघाची (India Women's Cricket Team) कर्णधार मिताली राजने (Mithali Raj) संकेत दिले. दोन दशकांहून अधिक काळ क्रिकेटचं मैदान गाजवणाऱ्या 38 वर्षीय मितालीने असेही म्हटले की ती न्यूझीलंडच्या (New Zealand) सजीव खेळपट्टीसाठी उत्तम वेगवान बॉलिंगचा पर्याय शोधत आहे. भारताच्या सर्वोत्कृष्ट महिला क्रिकेटपटूने ‘1971: द बिगनिंग ऑफ इंडियाज क्रिकेटिंग ग्रेटनेस’ पुस्तकाच्या आभासी लाँच वेळी म्हटले की, “आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 21 वर्षे झाली आहेत आणि मला माहित आहे की 2022 वर्ल्ड कप... हे माझ्या निवृत्तीचे वर्ष असेल.” हार्पर कॉलिन्स यांच्या पुस्तकाचे सहलेखन बोरिया मजूमदार आणि गौतम भट्टाचार्य यांनी केले आहे. मिताली वनडे आंतरराष्ट्रीय फॉरमॅटमध्ये 7000 पेक्षा अधिक धावा करणारी एकमेव महिला फलंदाज आहे. (Mithali Raj ने रचला विक्रम; ठरली 10,000 धावा करणारी पहिली भारतीय महिला क्रिकेटपटू)

मिताली म्हणाली, “शेवटचे वर्ष माझ्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या 20 वर्षांच्या बरोबरीचे आहे. मला माहित आहे की सध्या कठीण काळआहे परंतु माझ्या तंदुरुस्तीवर काम करत राहणे माझ्याकडून खूप काही घेते. मी काही तरुण होत नाही, खरं तर मी वयस्कर होत आहे आणि मला तंदुरुस्तीचे महत्त्व माहित आहे.” तिने कोविड-19 काळात स्वत: ला प्रेरित ठेवण्याविषयी उघडपणे सांगितले की, "भावनिकदृष्ट्या बळकट होणे खूप महत्वाचे आहे कारण आम्हाला माहित आहे की विश्वचषक स्पर्धेपूर्वी फारच कमी दौरे होतील.” भारतीय महिला संघाला वर्ल्ड कपपूर्वी इंग्लंड, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडचा परदेश दौरा आणि त्यानंतर वेस्ट इंडिजविरुद्ध घरच्या मैदानावर मालिका अशा चार द्विपक्षीय मालिका खेळायच्या आहेत.

मितालीने 1999 मध्ये आयर्लंड विरुद्ध आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पहिले पाऊल टाकले होते. त्यांनतर इंग्लंड संघाविरुद्ध 2002 मध्ये वनडे 2006 मध्ये टी-20 पदार्पण केलं होतं. मिताली टीम इंडियासाठी 20 वर्षाहून अधिक क्रिकेट खेळणारी एकमेव महिला तर सचिन तेंडुलकरनंतर दुसरी खेळाडू आहे. सचिनने 24 वर्षानंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली होती.

(The above story first appeared on LatestLY on Apr 24, 2021 05:49 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).