IND vs NZ Test Match Tickets: भारत-न्यूझीलंड कसोटी सामन्याचे तिकिट सर्वसामान्यांच्या बजेटमध्ये; जाणून घ्या किंमत आणि कधीपासून सुरू होणार विक्री?

मुंबईत होणाऱ्या कसोटी सामन्याची तिकिटे कधीपासून विक्रीसाठी उपलब्ध असणार आहेत, जाणून घ्या.

Photo Credit-X

IND vs NZ Test Match Tickets Mumbai Wankhede Stadium: भारत विरुद्ध न्यूझीलंड संघातील तीन सामन्यांची कसोटी मालिका (India vs New Zealand Test Match) आजपासून सुरू झाली आहे. पहिला कसोटी सामना आज 16 ऑक्टोबर रोजी बंगळुरू येथे सुरू होणार होता. मात्र, पावसाने त्यात अडथळा निर्माण केला आहे. पावसामुळे पहिल्या दिवशी लंच ब्रेकपर्यंत नाणेफेकही झालेली नाही. त्यामुळे आज सामना खेळवला जाणार की नाही यात शंका आहे. हवामानाचा अंदाज पाहता पहिल्या कसोटीत किती दिवस सामना खेळवला जाईल. याबाबत सांगता येत नाही. पाऊस पहिल्या कसोटीच्या सर्व दिवस म्हणजे पाच दिवस धुमाकूळ घालणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे.

तर, दुसरा कसोटी सामना पुणे येथे होणार आहे. महाराष्ट्रात पावसाचे तसे काही संकेत नाही. त्यामुळे दुसरा कसोटी सामना आणि तिसरा कसोटी सामना विना अडथळा पार पडेल. मात्र, त्याआधी मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर खेळवल्या जाणाऱ्या कसोटी सामन्याचे तिकिट ऑनलाईन कधी आणि किती दरात (IND vs NZ Test Match Tickets) मिळेल हे जाणून घेऊयात. (हेही वाचा: Mary Kom Criticize Indian Boxers: 'मी अजूनही त्यांच्यापेक्षा चांगली कामगिरी करू शकते'; पॅरिसमधील भारतीय बॉक्सर्सच्या कामगिरीवर मेरी कोमची आगपाखड)

मुंबईच्या प्रसिद्ध वानखेडे स्टेडियमवर होणाऱ्या या सामन्यासाठीची तिकीटे सर्वसामान्यांना परवडणारी आहेत. तिकिटांच्या किमती 325 पासून सुरू आहेत. तर, सर्वात महाग तिकिट 1500 रुपयांपर्यंत आहे. तिकिटांच्या किंमतींबद्दल बोलायचं झालं तर तर नॉर्थ स्टँड, सचिन तेंडुलकर स्टँड आणि विजय मर्चंट स्टँड, जे सर्वसामान्यांसाठी खुले आहेत, त्याची किंमत 1500 रुपये आहे. सुनील गावस्कर स्टँडसाठी, 325 रुपये आणि पूर्वकडील वरच्या भागासाठी 625 रुपये तिकिटांची किंमत आहे. ही किंमत धोरणे अशा हाय-प्रोफाइल सामन्यांच्या होस्टिंगशी संबंधित खर्चासह प्रवेशयोग्यता संतुलित करण्याचा प्रयत्न दर्शवतात.

मुंबईच्या प्रसिद्ध वानखेडे स्टेडियमवर 1 ते 5 नोव्हेंबरदरम्यान तिसऱ्या कसोटी सामना होणार आहे. त्यासाठी ऑनलाईन तिकिट विक्री 18 ऑक्टोबरपासून म्हणजेच शुक्रवारपासून सुरू होणार आहे. मुंबई क्रिकेट असोसिएशनने त्याबाबतची घोषणा केली. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या शाळांतील मुलांना आणि हॅरिस आणि जाईल्स शिल्ड स्पर्धेच्या उपांत्य फेरीतील मुलांना या कसोटी सामन्याचे मोफत पास मिळणार आहेत. डिसेंबर 2021 नंतर म्हणजेच तीन वर्षांनंतर मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर भारत-न्यूझीलंड कसोटी सामना खेळवला जाणार आहे, त्यामुळे हा कसोटी सामना जास्त खास असणार आहे.