India Beat Sout Africa 4th T20I Scorecard: भारताने दक्षिण आफ्रिकेचा 135 धावांनी केला पराभव, 3-1 अशी जिंकली मालिका; अर्शदीप सिंगची घातक गोलंदाजी
यासह टीम इंडियाने मालिका 3-1 अशी खिशात घातली आहे. या मालिकेत दक्षिण आफ्रिकेची कमान एडन मार्करामच्या खांद्यावर होती. तर टीम इंडियाचे नेतृत्व सूर्यकुमार यादव करत होते.
South Africa National Cricket Team vs India National Cricket Team, 4th T20I Match: दक्षिण आफ्रिका राष्ट्रीय क्रिकेट संघ विरुद्ध भारतीय राष्ट्रीय क्रिकेट संघ चार सामन्यांच्या टी-20 मालिकेतील चौथा आणि शेवटचा सामना आज (IND vs SA 4th T20I) जोहान्सबर्ग येथील वाँडरर्स स्टेडियमवर खेळवला गेला. या सामन्यात भारताने दक्षिण आफ्रिकेचा 135 धावांनी पराभव केला आहे. यासह टीम इंडियाने मालिका 3-1 अशी खिशात घातली आहे. या मालिकेत दक्षिण आफ्रिकेची कमान एडन मार्करामच्या खांद्यावर होती. तर टीम इंडियाचे नेतृत्व सूर्यकुमार यादव करत होता. (हे देखील वाचा: Sanju Samson New Record: संजू सॅमसनने शतक झळकावून इतिहास रचला, भारतीय क्रिकेटमध्ये असा पराक्रम करणारा ठरला पहिला खेळाडू)
दरम्यान, चौथ्या आणि शेवटच्या टी-20 सामन्यात टीम इंडियाचा कर्णधार सूर्यकुमार यादवने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीला आलेल्या टीम इंडियाची सुरुवात चांगली झाली आणि पहिल्या विकेटसाठी दोन्ही सलामीवीरांनी शानदार फलंदाजी करत अवघ्या 35 चेंडूत 73 धावा केल्या. टीम इंडियाने 20 षटकात एक विकेट गमावून 283 धावा केल्या. टीम इंडियासाठी तिलक वर्माने सर्वाधिक 120 नाबाद धावांची स्फोटक खेळी खेळली.
या स्फोटक खेळीदरम्यान तिलक वर्माने अवघ्या 47 चेंडूत 10 षटकार आणि 9 चौकार लगावले. तिलक वर्माशिवाय संजू सॅमसननेही अवघ्या 56 चेंडूत सहा चौकार आणि नऊ षटकार लगावत 109 धावा केल्या. लुथो सिपमला याने दक्षिण आफ्रिकेच्या संघाला पहिले मोठे यश मिळवून दिले. दक्षिण आफ्रिकेकडून लुथो सिपमला याने सर्वाधिक एक विकेट घेतली. हा सामना जिंकण्यासाठी दक्षिण आफ्रिकेच्या संघाला 20 षटकात 284 धावा करायच्या होत्या.
लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या दक्षिण आफ्रिकेच्या संघाची सुरुवात निराशाजनक झाली आणि अवघ्या 10 धावांवर संघाचे चार फलंदाज पॅव्हेलियनमध्ये परतले. दक्षिण आफ्रिकेचा संपूर्ण संघ 18.2 षटकांत अवघ्या 148 धावांत गारद झाला. दक्षिण आफ्रिकेकडून ट्रिस्टन स्टब्सने सर्वाधिक 43 धावांची खेळी खेळली. ट्रिस्टन स्टब्सशिवाय डेव्हिड मिलरने 36 धावा केल्या. टीम इंडियाचा स्टार गोलंदाज अर्शदीप सिंगने पहिले मोठे यश मिळवून दिले. टीम इंडियाकडून अर्शदीप सिंगने सर्वाधिक तीन विकेट घेतल्या. अर्शदीप सिंगशिवाय वरुण चक्रवर्ती आणि अक्षर पटेल यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले.