IPL Auction 2025 Live

Lowest Test Score of India: भारत 46 धावांवर ऑलआऊट, रोहित सेनेच्या नावावर एक नव्हे तर अनेक लज्जास्पद विक्रम

एकामागून एक विकेट पडत राहिल्या आणि संपूर्ण भारतीय संघ 46 धावांत ऑलआऊट झाला.

IND vs NZ (Photo Credit - X)

IND vs NZ 1st Test 2024: बंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर भारतीय क्रिकेट संघाच्या नावावर एक नकोसा विक्रम नोंदवण्यात आला आहे. भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील तीन सामन्यांच्या मालिकेतील पहिला कसोटी सामना बेंगळुरू येथे खेळवला जात आहे. सामन्याचा पहिला दिवस पावसात वाहून गेला आणि दुसऱ्या दिवशी नाणेफेक झाली. टीम इंडियाने नाणेफेक जिंकून कर्णधार रोहित शर्माने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, हा निर्णय टीम इंडियासाठी आत्मघातकी ठरला. एकामागून एक विकेट पडत राहिल्या आणि संपूर्ण भारतीय संघ 46 धावांत ऑलआऊट झाला.

पाच फलंदाज खाते न उघडता बाद

भारताने 34 धावांत सात गडी गमावले होते, ज्यामध्ये पाच फलंदाज खाते न उघडता बाद झाले होते. कसोटी क्रिकेटमध्ये भारतीय भूमीवर टीम इंडियाची ही सर्वात कमी धावसंख्या आहे. भारतीय संघाकडून सर्वोत्कृष्ट स्कोअरर ठरला तो ऋषभ पंत, ज्याने 20 धावांची खेळी केली. याशिवाय यशस्वी जैस्वालने 13 धावा केल्या. या दोघांशिवाय इतर कोणत्याही फलंदाजाला दुहेरी धावसंख्याही गाठता आली नाही.

कसोटी क्रिकेटमध्ये भारतीय सर्वात कमी धावसंख्या 36 धावा

एकूणच कसोटी क्रिकेटमध्ये भारतीय संघाची सर्वात कमी धावसंख्या 36 धावा आहे. 2020 मध्ये, भारतीय संघ ब्रिस्बेन कसोटीत ऑस्ट्रेलियाविरुद्ध 36 धावांवर ऑलआऊट झाला असला तरीही टीम इंडियाने तो कसोटी सामना 2-1 ने जिंकला होता. कसोटी क्रिकेटमध्ये भारताची दुसरी सर्वात कमी धावसंख्या 42 धावा आहे, जी 1974 मध्ये बनवण्यात आली होती. त्यानंतर इंग्लंडविरुद्धच्या लॉर्ड्स कसोटीत भारत 42 धावांत ऑलआऊट झाला.

भारताचा कसोटी इतिहासातील सर्वात कमी धावसंख्या

36 विरुद्ध ऑस्ट्रेलिया, ॲडलेड, 2020

42 विरुद्ध इंग्लंड, लॉर्ड्स, 1974

46 विरुद्ध न्यूझीलंड, बेंगळुरू, 2024*

58 विरुद्ध ऑस्ट्रेलिया, ब्रिस्बेन, 1947

58 विरुद्ध इंग्लंड, मँचेस्टर, 1952