IND W Beat WI W, 1st ODI Match 2024: पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारताचा वेस्ट इंडिंजवर 211 धावांनी मोठा विजय, रेणुका ठाकूरच्या 5 विकेट
पहिल्या एकदिवसीय सामन्यात वेस्ट इंडिजचा कर्णधार हेली मॅथ्यूजने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजीला आलेल्या टीम इंडियाचा धमाका झाला आणि दोन्ही सलामीवीरांनी पहिल्या विकेटसाठी 110 धावांची भागीदारी केली. टीम इंडियाने निर्धारित 50 षटकात नऊ गडी गमावून 314 धावा केल्या.
India Women's National Cricket Team vs West Indies Women's Cricket Team, 1st ODI ICC Championship Match Scorecard Update: भारतीय महिला राष्ट्रीय क्रिकेट संघ विरुद्ध वेस्ट इंडिज महिला क्रिकेट संघ यांच्यातील तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतील (ODI Series) पहिला सामना आज म्हणजेच 22 डिसेंबर रोजी खेळवला जात आहे. दोन्ही संघांमधील हा सामना वडोदरा (Vadodara) येथील कोटंबी स्टेडियमवर (Kotambi Stadium) खेळला जात आहे. ही एकदिवसीय मालिका आयसीसी चॅम्पियनशिप सामन्यांतर्गत खेळवली जात आहे. या मालिकेत टीम इंडियाची कमान हरमनप्रीत कौरच्या (Harmanpreet Kaur) खांद्यावर आहे. तर, वेस्ट इंडिजचे नेतृत्व हेली मॅथ्यूज (Hayley Matthews) करत आहे. (हेही वाचा - IND-W vs WI-W 1st ODI 2024 Live Updates: पहिल्या एकदिवसीय सामन्यात स्मृती मंधानाचे अर्धशतक, भारताची मोठ्या धावसंख्येकडे वाटचाल)
अलीकडेच टीम इंडियाने टी-20 मालिका 2-1 ने जिंकून या मालिकेत दमदार सुरुवात केली असून आता वनडेतही आपला दबदबा कायम ठेवण्याचा प्रयत्न करणार आहे. दुसरीकडे, हा सामना वेस्ट इंडिजसाठी आव्हानात्मक असेल, कारण संघाचा अलीकडचा एकदिवसीय फॉर्म निराशाजनक आहे. टीम इंडियाने वनडे मालिकेत नव्या उमेदीने प्रवेश केला आहे. टीम इंडियाने वेस्ट इंडिजविरुद्ध एकूण 26 एकदिवसीय सामने खेळले आहेत. या काळात टीम इंडियाचे पारडे जड दिसते. 26 पैकी टीम इंडियाने 21 सामने जिंकून आघाडी घेतली आहे, तर वेस्ट इंडिजने पाच सामने जिंकले आहेत.
दरम्यान, पहिल्या एकदिवसीय सामन्यात वेस्ट इंडिजचा कर्णधार हेली मॅथ्यूजने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजीला आलेल्या टीम इंडियाचा धमाका झाला आणि दोन्ही सलामीवीरांनी पहिल्या विकेटसाठी 110 धावांची भागीदारी केली. टीम इंडियाने निर्धारित 50 षटकात नऊ गडी गमावून 314 धावा केल्या.
टीम इंडियासाठी सलामीवीर स्मृती मानधना हिने 91 धावांची शानदार खेळी केली. या उत्कृष्ट खेळीदरम्यान स्मृती मानधनाने 102 चेंडूत 13 चौकार लगावले. स्मृती मानधनाशिवाय हरलीन देओलने 44 धावा केल्या.
दुसरीकडे, हेली मॅथ्यूजने वेस्ट इंडिज संघाला पहिले मोठे यश मिळवून दिले. वेस्ट इंडिजकडून झैदा जेम्सने सर्वाधिक 5 बळी घेतले. झैदा जेम्सशिवाय हेली मॅथ्यूजने दोन बळी घेतले. हा सामना जिंकण्यासाठी वेस्ट इंडिज संघाला 50 षटकात 315 धावा करायच्या होत्या.
लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या वेस्ट इंडिज संघाची सुरुवात निराशाजनक झाली आणि अवघ्या 36 धावांवर संघाचे सहा फलंदाज पॅव्हेलियनमध्ये परतले. वेस्ट इंडिजचा संपूर्ण संघ 26.2 षटकांत केवळ 103 धावांवर गारद झाला. वेस्ट इंडिजसाठी अफी फ्लेचरने 24 नाबाद धावांची उत्कृष्ट खेळी खेळली. अफी फ्लेचरशिवाय शमीन कॅम्पबेलने 21 धावा केल्या.
रेणुका ठाकूर सिंगने टीम इंडियाला पहिले मोठे यश मिळवून दिले. टीम इंडियाकडून रेणुका ठाकूर सिंगने सर्वाधिक पाच विकेट घेतल्या. रेणुका ठाकूर सिंगशिवाय तितस साधू आणि प्रिया मिश्रा यांनी दोन गडी बाद केले. या मालिकेतील दुसरा सामना मंगळवारी म्हणजेच 24 डिसेंबर रोजी वडोदरा येथील कोटंबी स्टेडियमवर दुपारी दीड वाजल्यापासून खेळवला जाईल.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)