IND W vs WI W 1st ODI 2024 Live Score Update: स्मृती मंधानाच्या 91 धावांच्या जोरावर भारताचे वेस्ट इंडिजसमोर 315 रन्सचे आव्हान, पाहा संपूर्ण स्कोरकार्ड

नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजीला आलेल्या टीम इंडियाने धमाका केला आणि दोन्ही सलामीवीरांनी पहिल्या विकेटसाठी 110 धावांची भागीदारी केली.

स्मृति मंधाना (Photo Credits: BCCI/Twitter)

India Women's National Cricket Team vs West Indies Women's Cricket Team, 1st ODI ICC Championship Match Scorecard Update:   भारतीय महिला राष्ट्रीय क्रिकेट संघ विरुद्ध वेस्ट इंडिज महिला क्रिकेट संघ यांच्यातील तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतील (ODI Series)  पहिला सामना आज म्हणजेच 22 डिसेंबर रोजी खेळवला जात आहे. दोन्ही संघांमधील हा सामना वडोदरा (Vadodara) येथील कोटंबी स्टेडियमवर (Kotambi Stadium)  खेळला जात आहे. ही एकदिवसीय मालिका आयसीसी चॅम्पियनशिप सामन्यांतर्गत खेळवली जात आहे. या मालिकेत टीम इंडियाची कमान हरमनप्रीत कौरच्या (Harmanpreet Kaur) खांद्यावर आहे. तर, वेस्ट इंडिजचे नेतृत्व हेली मॅथ्यूज (Hayley Matthews) करत आहे.  (हेही वाचा  -  IND-W vs WI-W 1st ODI 2024 Live Updates: पहिल्या एकदिवसीय सामन्यात स्मृती मंधानाचे अर्धशतक, भारताची मोठ्या धावसंख्येकडे वाटचाल)

अलीकडेच टीम इंडियाने टी-20 मालिका 2-1 ने जिंकून या मालिकेत दमदार सुरुवात केली असून आता वनडेतही आपला दबदबा कायम ठेवण्याचा प्रयत्न करणार आहे. दुसरीकडे, हा सामना वेस्ट इंडिजसाठी आव्हानात्मक असेल, कारण संघाचा अलीकडचा एकदिवसीय फॉर्म निराशाजनक आहे. टीम इंडियाने वनडे मालिकेत नव्या उमेदीने प्रवेश केला आहे. टीम इंडियाने वेस्ट इंडिजविरुद्ध एकूण 26 एकदिवसीय सामने खेळले आहेत. या काळात टीम इंडियाचे पारडे जड दिसते. 26 पैकी टीम इंडियाने 21 सामने जिंकून आघाडी घेतली आहे, तर वेस्ट इंडिजने पाच सामने जिंकले आहेत.

पहिल्या डावाचे स्कोअरकार्ड येथे पहा:

दरम्यान, पहिल्या एकदिवसीय सामन्यात वेस्ट इंडिजचा कर्णधार हेली मॅथ्यूजने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजीला आलेल्या टीम इंडियाने धमाका केला आणि दोन्ही सलामीवीरांनी पहिल्या विकेटसाठी 110 धावांची भागीदारी केली.

टीम इंडियाने निर्धारित 50 षटकात नऊ गडी गमावून 314 धावा केल्या. टीम इंडियासाठी सलामीवीर स्मृती मानधना हिने 91 धावांची शानदार खेळी केली. या उत्कृष्ट खेळीदरम्यान स्मृती मानधनाने 102 चेंडूत 13 चौकार लगावले. स्मृती मानधनाशिवाय हरलीन देओलने 44 धावा केल्या.

दुसरीकडे, हेली मॅथ्यूजने वेस्ट इंडिज संघाला पहिले मोठे यश मिळवून दिले. वेस्ट इंडिजकडून झैदा जेम्सने सर्वाधिक 5 बळी घेतले. झैदा जेम्सशिवाय हेली मॅथ्यूजने दोन बळी घेतले. हा सामना जिंकण्यासाठी वेस्ट इंडिज संघाला 50 षटकात 315 धावा करायच्या आहेत. टीम इंडियाला हा सामना जिंकून मालिकेत आघाडी घेण्याची इच्छा आहे.

 

Tags

IND W vs WI W 3rd T20I 2024 LIVE Streaming IND W vs WI W 3rd T20I 2024 IND W vs WI W 3rd T20I IND W vs WI W cricket women DY Patil Stadium Hayley Matthews in w vs wi w in w vs wi w t20 IND vs WI ind vs wi t20 ind vs wi w ind vs wi women ind vs wi women's t20 ind w vs wi w t20 scorecard IND-W vs WI-W 1st T20I 2024 IND-W vs WI-W 1st T20I 2024 Preview IND-W vs WI-W 2024 ind-w vs wi-w today match Ind(W) IND(W) vs WI(W) India India vs West Indies India vs West Indies Women india w vs wi w India Women vs West Indies Women India women's national cricket team india women's national cricket team vs west indies women match scorecard India Women’s Cricket Team India Women’s National Cricket Team vs West Indies Women’s Cricket Team indw vs wi-w indw vs wiw t20 Jemimah Rodrigues Shafali Verma Smriti Mandhana Titas Sadhu West Indies West Indies vs India West Indies Women vs India Women West Indies women's cricket team West Indies women's cricket team vs India women's national cricket team where to watch india women's national cricket team vs west indies women wi w vs ind w भारत भारत डब्ल्यू वि वेस्ट इंडीज प भारत विरुद्ध वेस्ट इंडीज भारतीय महिला क्रिकेट संघ भारत महिला राष्ट्रीय क्रिकेट संघ भारत-प वि डब्ल्यू डब्ल्यू 2024 भारतीय महिला वि वेस्ट इंडीज महिला भारतीय महिला राष्ट्रीय क्रिकेट संघ वेस्ट इंडीज वेस्ट इंडीज विरुद्ध भारत वेस्ट इंडिज महिला क्रिकेट संघ वेस्ट इंडिज महिला विरुद्ध भारतीय महिला