IND-W vs SL-W, Dubai Weather, Rain Forecast and Pitch Report: दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर भारत विरुद्ध श्रीलंका महिला टी 20 विश्वचषक 2024 च्या सामन्यात कसे असेल हवामान?

श्रीलंकेची विश्वचषकातील आत्तापर्यंतची कामगिरी पाहता भारत हा सामना जिंकेल अशी आशा आहे. दरम्यान दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमची खेळपट्टी कशी असेल? त्याशिवाय तेथे हवामान कसे असेल जामून घेऊयात.

Dubai International Stadium (Photo Credits: @AJpadhi/X)

IND-W vs SL-W, Dubai Weather, Rain Forecast and Pitch Report: महिला टी 20 विश्वचषकात उद्या भारत आणि श्रीलंकेचा संघ (IND vs SL)आमनेसामने येत आहेत. विश्वचषकात भारतीय महिलांनी दोन सामने खेळले आहेत. त्यातली एक सामना गमावला. मात्र, पाकिस्तान महिलांविरुद्धचा दुसरा सामना भारताने जिंकला. दुसरीकडे श्रीलंकेच्या महिला संघाने महिला टी 20 विश्वचषक २०२४ मध्ये दोन सामने खेळले आहेत. मात्र, अजूनही त्यांच्या पदरी विजय आलेला नाही. मागच्या दोन्ही सामन्यात श्रीलंकेला पराभवाचा सामना करावा लागला आहे.

हवामानाचा अंदाज

हवामान विभागाच्या अदाजानुसार, सामन्यादरम्यान ढगाळ वातावरण निर्माण होण्याची शक्यता आहे. परंतु पाऊस पडण्याची शक्यता नाही. त्याशिवाय, सामन्यादरम्यान तापमान 31-32 अंश सेल्सिअस पर्यंत असेल.

दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियम खेळपट्टी अहवाल

दुबईतील दुबई इंटरनॅशनल स्टेडियमची खेळपट्टी गोलंदाज आणि फलंदाजांसाठी सारखीच आहे. वेगवान गोलंदाजांना नवीन चेंडूने गोलंदाजी करणे खूप उपयुक्त ठरेल. तर वेळ निघून गेल्याने फलंदाजांसाठी धावा काढणे सोपे होईल.