IND-W vs SA-W Warm-UP Match 1st Inning Scorecard: भारतीय महिलांचे दक्षिण आफ्रिकेसमोर 145 धावांचे आव्हान; रिचा घोष आणि दिपाली शर्माची शानदार फटकेबाजी

भारताच्या फलंदाजांना सुरुवातीला अडचणीचा सामना करावा लागला, पण शेवटी दीप्ती शर्मा आणि ऋचा घोष या जोडीने संघाला स्पर्धात्मक धावसंख्येपर्यंत नेले.

Photo Credit - ICC

South Africa Women National Cricket Team vs India Women National Cricket Team Warm-up Match 2024 Live Toss Update:   दक्षिण आफ्रिका महिला राष्ट्रीय क्रिकेट संघ विरुद्ध भारतीय महिला राष्ट्रीय क्रिकेट संघ ICC महिला T20 विश्वचषक 2024 चा 10 वा सराव सामना 01 ऑक्टोबर (मंगळवार) रोजी दुबईतील ICC अकादमी मैदानावर खेळला जात आहे. महिला T20 विश्वचषकाच्या सराव सामन्यात दक्षिण आफ्रिकेची कर्णधार स्युने लुसने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला असून,  टिम इंडियाने 20 षटकांत 7 बाद 144 धावा करत दक्षिण आफ्रिकेसमोर जिंकण्यासाठी 145 धावांचे आव्हान ठेवले आहे. (हेही वाचा - IND-W vs SA-W Warm-UP Match: T20 विश्वचषकाच्या सराव सामन्यात दक्षिण आफ्रिका संघाने नाणेफेक जिंकून घेतला क्षेत्ररक्षणाचा निर्णय)

पहिल्याच षटकात शफाली वर्माला (0) अयाबोंगा खाकाने बाद केल्याने भारतीय संघाची सुरुवात चांगली झाली नाही. यानंतर स्मृती मानधना (21) आणि हरमनप्रीत कौर (10)ही लवकर परतल्या. भारताकडून रिचा घोषने 2 चौकार आणि 2 षटकाराच्या जोरावर 25 चेंडूत 36 धावा केल्या तर दिपाली शर्माने 29 चेंडूत 2 चौकाराच्या मदतीने 35 धावा केल्या. दक्षिण आफ्रिकेकडून आयबोंगा खाकाने 4 षटकांत 25 धावां देत पाच विकेट घेतल्या आहेत. भारताकडून दिपाली आणि रिचा व्यतिरित्त जेमिमा रोड्रिग्जने 30 धावा केल्या. यांच्या शिवाय अन्य कोणत्याच भारतीय फलंदाजांला चांगली खेळी करता आली नाही.

पाहा पोस्ट -

 

दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार सुने लुसने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारताच्या फलंदाजांना सुरुवातीला अडचणीचा सामना करावा लागला, पण शेवटी दीप्ती शर्मा आणि ऋचा घोष या जोडीने संघाला स्पर्धात्मक धावसंख्येपर्यंत नेले.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif